"साम"वृत्तवाहिनीच्या संपादकपदी राजेंद्र हुंजे
राम जळकोटे-तुळजापूर
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील येनेगुर गावचे सुपुत्र. राजेंद्र हुंजे यांची पत्रकारिता क्षेत्रातील कार्य हे उल्लेखनीय आणि अभिमानास्पद आहे.राजेंद्र हुंजे हे मूळचे उमरगा तालुक्यातील येणेगुर गावचे असून त्यांचा प्रिंट मीडिया मध्ये सुरू झालेला प्रवास हा इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील वृत्तवाहिनीच्या संपादक पदापर्यंत येऊन पोहोचला आहे.हुंजे यांनी आपली पत्रकारिता ही सोलापूर जिल्ह्यात तरुण भारत या वृत्तपत्रपासून सुरू केली.नंतर त्यांची प्रिंट मीडिया क्षेत्रातील अनुभवी कार्यप्रणाली पाहता त्यांनी स्वतःला इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात झोकून दिले.तिथे त्यांचा एक ground रिपोर्टर पासून सुरू झालेला प्रवास हा एका star anchor पदापर्यंत येऊन पोहोचला. पूर्वी ओळखल्या जाणाऱ्या IBN लोकमत या मराठी वृत्तवाहिनीच्या star anchor या पदापर्यंत येऊन त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं.हुंजे हे कार्यक्षेत्र मध्ये काम करीत असताना त्यांनी आपलेपणा, माणुसकी जपली आहे आणि अजूनही जपत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील युवकांसाठी ते आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत.महाराष्ट्र भरात ते आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमातून युवकांना ते सतत संबोधित करत असतात.हुंजे हे एक आदर्श पत्रकार तसेच लेखक, अभ्यासक,म्हणून ही आजवर त्यांची महाराष्ट्र मध्ये ख्याती आहे. आजवर ते पत्रकारिता क्षेत्रात मध्ये तळागाळातील प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांना, वाचा फोडण्याचे काम केले आहे.
हुंजे हे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र भरातील नव्याने पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या युवकांना सतत मार्गदर्शन करीत असतात.त्यांची आजवर पत्रकारिता क्षेत्रातील कार्य पाहता, त्यांना दि.१९ डिसेंबर रोजी साम tv मराठी वृत्तवाहिनीच्या संपादक पदाचा मान त्यांना मिळाला आहे. या निवडीचे उस्मानाबाद जिल्हा तसेच महाराष्ट्र भरामध्ये प्रसार माध्यमे यांच्या माध्यमातून त्यांच्या वर आज शुभेच्छा चा वर्षाव होतो आहे.