विशेष घटक योजनेचा निधी दुसरीकडे वळवला, संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्रचा आंदोलनाचा इशारा....
उमेश पाटील -सांगली
सोनवडे ता.शिराळा येथे विशेष घटक योजनेतून मंजूर झालेला निधी दुसरीकडे वळवला आहे.तो पूर्वीप्रमाणे योग्य ठिकाणी खर्च व्हावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संविधान प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य ने दिला आहे. तसं निवेदन तहसीलदार गणेश शिंदे यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.
सोनवडे, ता. शिराळा येथील हरिजन वस्ती मध्ये साकव बांधण्यासाठी विशेष घटक योजनेतून 24 लाख रुपये निधी समाज कल्याण विभागाकडून मंजूर झाला आहे. तो निधी काही प्रस्थापितांनी व संबंधित पदाधिकाऱ्यांनी भलत्याच ठिकाणी वळवण्यात आल्याची घटना उघडकीस आलेली आहे. स्थानिक हरिजन वस्तीतील काही लोकांच्या पुढाकाराने संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघटनेच्या निदर्शनास आणून दिले. दि.३१ डिसेंबर २०२० पर्यंत विशेष घटक योजनेचे काम नियोजित ठिकाणी योग्य वापर न केल्यास संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसे
निवेदन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संदिप कांबळे यांच्या वतीने तहसीलदार शिराळा यांना देण्यात आले आहे. संघटनेचे पदाधिकारी प्रकाश लोखंडे, विजय कांबळे, यशवंत कांबळे , ज्ञानदेव कांबळे , पोपट बनसोडे, बाळासाहेब कांबळे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.