Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

No title

 तासगाव तालुक्‍यातींल निवडणुकीत आचार संहितेचे काटेखोर पालन करा; निवडणूक नित्रंयण अधिकारी कल्पना ढवळे.

राजू थोरात- तासगाव



तासगाव तालुक्यातील 68 ग्रामपंचायती पैकी 39 ग्रामपंचायतीची निवडनुकची रणधुमाळी  सुरू झाली आहे.

15 तारखेपासून आचारसंहिता ही चालू झाली आहे.कोरोनाही सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगावच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे यांनी पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली  उमेदवारांना निवडणुक आयोगाने निर्बंध घालून दिलेले आहेत. निवडणुकीत खर्चाचे निर्बंधही घातले आहेत.

वार्ड क्र 1 ते 10 मध्ये  25 हजार खर्च उमेदवारांनी करावायचा आहे. ज्या मोठ्या गावात वार्ड 11 ते 13 आहेत तेथे 35 हजार उमेदवारानी खर्च करावायचा आहे. 13 च्या पुढे वार्ड असतील तर तेथे उमेदवारांनी 50 हजार खर्च करावायचा आहे.

पुढे ढ़वळे म्हणाल्याकी कोणत्याही उमेदवारांनी राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह वापरावयाचे नाही.

तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरल्यानंतर निवडणूक विशेष शाखेमध्ये जमा करावयाचा आहे. कोरोना असल्यामुळे कोणीही शक्तिप्रदर्शन करू नये. तोंडाला मास्क घालूनच यावयाचे आहे.उमेदवारांनी स्वता एकट्याने किंवा सोबत फक्त एकच कार्यकर्ता आणावा. शक्तिप्रदर्शन अथवा गर्दी केल्यास आचारसंहिता भंग झाल्यास गुन्हे दाखल केले जातींल.



39 ग्रामपंचायतीमध्ये एकूण 189 मतदान केंद्रे आहेत.

दी 25 ते 27  पर्यत शासकीय सुट्टी असल्याने निवडणूक शाखा बंद राहतील. परंतु उमेदवार 25 ते 27 या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरू शकतो.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 आहे. तर अर्ज छाननी 4 जानेवारी रोजी आहे.

अर्ज घेण्याची शेवटची तारीख 4 जानेवारी पर्यत आहे.

तर 15 जानेवारी रोजी मतदान आहे. मतमोजणी 18 जानेवारी तासगाव तहसील कार्यालयात होईल.

मतदान केंद्रावरही मतदारांनी तोंडाला मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे हे निर्बंध आहेत.

पत्रकार परिषदेत पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे,सहा पोलिस निरीक्षक पंकज पवार उपस्थित होते




पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी माहिती दिली की निवडणुकी विषयी पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. उमेदवारांनी तहसील कार्यालयाजवळ शक्तिप्रदर्शन करू नये. तसेच सोशल डिस्टन्स व तोंडाला मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क घातला नाही तर निवडणूक शाखेमध्ये उमेदवाराला सोडले जाणार नाही.शक्तिप्रदर्शन गर्दी केल्यास आचारसंहितेचे गुन्हे दाखल करणार.



दी 24 रोजी

13 अर्ज दाखल झाले आहेत

जुळेवाडी 2

कवठेएकंद 2

येळावी 1 

धुळगाव 7

पाडळी 1

निवडणूक कक्षाची पाहणी करताना निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, नायब तहसिलदार प्रवीणकुमार माळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार ,नितिन केराम व इतर अधिकारी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies