विठ्ठलवाडीच्या भुयारी मार्गाच्या मागणीला राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी दाखवतात केराची टोपली ,नागरिक भुयारी मार्गावर ठाम
उमेश पाटील -सांगली
आमच्या गावाजवळ भुयारी मार्ग द्या अशी मागणी विठ्ठलवाडीचे नागरिक रत्नागिरी - नागपूर महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडे गेले अनेक दिवस करीत आहेत . तोंडी - लेखी आणि निवेदने देऊनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत . इतकेच नव्हे तर आमच्या मागणी चे कागद हे अधिकारी केराच्या टोपलीत टाकत आहेत असा आरोप नागरिक करीत आहेत .
रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-166 चे काम सध्या युध्द पातळीवर सुरू आहे. या साठी मोठी यंत्रणा येथे रात्रंदिवस काम करीत आहे .परंतु विठ्ठलवाडी गावानजीक काही वळणासह एक सारखा थेट महामार्ग असल्याने , येथे वाहने भरधाव वेगाने ये-जा करीत असतात . त्यामुळे येथे नेहमी लहानमोठे अपघात घडत आहेत . चार दिवसांपूर्वीच दुचाकी व आयशर टेंपोच्या धडकेत बापलेकांना आपला प्राण गमवावा लागला . तर मायलेकी गंभीर जखमी झाल्या . हे ठिकाण म्हणजे अपघाताला आणि मृत्यूला आमंत्रण देण्याचे ठिकाण बनले आहे . म्हणूनच विठ्ठलवाडीचे नागरिक भुयारी मार्ग करावा अशी मागणी करीत आहेत .
विठ्ठलवाडीजवळ भुयारी मार्गाच्या मागणीला संबंधित विभागाकडून जाणूनबूजून थेट केराची टोपली दाखवली जात आहे.याबाबत संबंधित विभागाकडे चौकशी केली आसता ते कोरोनाचे कारण पुढे करून या राष्ट्रीय महामार्गचे बांधकाम पुर्ण झाल्या नंतर येथे निश्चित भुयारी मार्ग केला जाईल अशी अवास्तव व उडवाउडवीचे उतरे देतात . परंतु इतरञ महामार्गाच्या अनेक अडीआडचणी सोडविल्या जात आहेत.पण इथेच का आसे कारण सांगितले जाते अशी नागरिकांची व्यथा आहे . विठ्ठलवाडी जवळ तात्काळ भुयारी मार्गाची अपेक्षा नागरिक करीत आहेत.