तासगावातील वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी;
कर्मयोगी संत गाडगेबाबा -प्रा.आण्णासाहेब बागल
राजू थोरात-तासगाव
दगड धोंड्याची पूजा करण्यात वेळ आणि पैसा खर्च करू नका. देव दगडात नाही माणसात आहे.धर्माच्या नावावर कोंबड्या-बकऱ्या सारख्या मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नका असे सांगून सर्वांना आपल्या कृतीतून स्वच्छतेचा धडा देणारे संत गाडगेबाबा होते असे उदगार केंद्रसंयोजक प्रा. आण्णासाहेब बगल यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या संत गाडगे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात बोलताना काढले.ते पुढे म्हणाले हयातभर गाडगे बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती करण्यासाठी गावोगावी भटकंती केली. त्यांना सामाजिक न्याय , सुधारणा, आणि स्वच्छता याविषयात जास्त रूची होती. माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध त्यांनी दिला. समाजात अन्याय अत्याचार करणाऱ्यावर त्यांनी घणाघात केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.बी.ए. विभागाचे केंद्रसंयोजक डॉ.कुलदिप पाटील यांनी केले तर आभार प्रा.नितीन वाघमारे यांनी मानले या कार्यक्रमास केंद्र सहाय्यक श्री.स्वप्नील कुंभार , जगदीश सावंत, दिनेश मोरे, एम.एस.पाटील. व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.