Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोकणस्थ तेली समाज संस्थेची समाजबांधवाना नववर्षाची स्नेहपूर्ण दिनदर्शिका भेट

 कोकणस्थ तेली समाज संस्थेची समाजबांधवाना नववर्षाची स्नेहपूर्ण दिनदर्शिका भेट

 रविंद्र कुवेसकर -उतेखोल/माणगांव



ठाणे मुंबई येथुन रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्थेचे पदाधिकारी विनायक तार्लेकर (उपाध्यक्ष) यांचे मार्गदर्शनात रत्नाकर महाडीक (सल्लागार), रोहीणीताई महाडिक (सदस्य), शांताराम दळवी (कार्याध्यक्ष), राजन रहाटे (सचिव) देवेन्द्र राऊत (सहसचिव) हे रायगडच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पनवेल, पेण, रोहा, पाली, खोपोली, विळा, रवाळजे, साजे, कांदळगांव, वडवली, निजामपूर, साई उसर, वेळास, महाड, बिरवाडी या ठिकाणी अनेक तेलीसमाज बांधवांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेत, संवाद साधत संत श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज नववर्ष २०२१ दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) स्नेहपूर्ण वाटप केले आहे. 



       याच दरम्यान ही मंडळी माणगांव येथे आली असता येथिल माणगांव शहर तेली समाज संघटनेचे कुवेसकर, तार्लेकर, जाधव यांचे निवासस्थानी जाऊन भेट घेतली व नववर्षाचे कॅलेंडर वाटप केले. तसेच या निमित्ताने संवाद साधताना यापुढील संपूर्ण रायगड जिल्ह्यातील तेली समाजाचा एकत्रीत मोठा स्नेहमेळावा माणगांव येथे आयोजीत करणेसाठी प्रयत्न करणार असल्याची संकल्पना या मंडळीनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies