Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

खाडेवाडीचे शिवाजी नगर नामकरण सोहळा दिमाखात.

 खाडेवाडीचे शिवाजी नगर नामकरण सोहळा दिमाखात.

भाजप व राष्ट्रवादीचे नगरसेवक एकाच व्यासपीठावर...

राजकीय जुगलबंदी रंगली

राजू थोरात- तासगाव 



तासगाव पासून 4 किलोमीटर अंतरावर असलेले गाव खाडेवाडी.सदर खाड़ेवाड़ी तासगांव नगरपालिका हद्दित आहे.सदर गाव बेन्द्री गावालगत आहे.मतदानाला तासगांव शहरात येते.

 ह्या खाड़ेवाड़ीचां नामांतरण सोहळा तासगाव कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते दिमाखात झाले.आता रजिस्टर वरही शिवाजीनगर असे रूपांतर झाले आहे .या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर भाजप व राष्ट्रवादी नगरसेवकही उपस्तिथ होते.कार्यक्रमाचे स्वागतउत्सुक राष्ट्रवादीचे युवा नेते राहुल शिंदे हे होते. यावेळी प्रस्ताविक भाषणात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले की राहुल शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. खाडेवाडीचा नामांतर  सोहळा शिवाजीनगर असे जाहीर झाले,गेली 12 वर्षे आर आर आबा मंत्री असताना सतत राहुल शिंदे पाठपुरावा करत होते.

सार्थ अभिमान आहे शिवाजीनगर हे नाव ठेवल्याबद्दल.

त्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन खुजट म्हणाले की राहुल शिंदे हा तळमळीचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा आहे. कायम माहितीचा अधिकार टाकून अधिकाऱ्यांच्यावर वचक ठेवणारा धड़पड़ीचा कार्यकर्ता आहे.त्यामुळेच शिवाजीनगर नामांतरण झाले.

तदनंतर राहुल शिंदे यांनी खाड़ेवाडीचा इतिहास सांगितला.

खाडेवाडी हे जगाच्या नकाशावर नव्हतेच.कारण प्रत्येकजन राहतो त्या घराचे उतारे निघत नव्हते.

स्व आर आर आबा मंत्री असताना मी आबांच्याकड़े तक्रार केली की आमचे मतदान तासगाव शहरात,लाईट तासगाव शहरातून,पाणी तासगाव नगरपालिका हद्दीतुन मग आम्ही भारतात नाही का? तर त्यावेळी आबांनी जिल्हाधिकारी व भूमि अभिलेख यांची आढावा बैठक घेतली व खाडेवाडीचा उतारा काढा असे सांगितले.परंतु खाडेवाडीचा उताराच निघत नव्हता. आबांनीही पाठपुरावा करून मंत्रिमंडळात बाब उघडकीस आणून प्रस्ताव तयार केला जिल्हाधिकारी व भूमी अभिलेख अधिकारी यांना मंत्रिमंडळा कडून आदेश जारी केले.त्यावेळी खाडेवाडी हे गाव नकाशावर आले.



त्यानंतर वाडी म्हटलेकी मुलगी द्यायला कमीपणा वाटायचा.म्हणून परत आबांना सांगून सतत पाठपुरावा करत राहिलो.परंतु आबांचे निधन झाले.परत डगमगलो व आता खाडेवाडीचे नाव बदल्यांच्या अडचणी वाढल्या.पण आमदार सुमनताई आमदार झाल्यावर पुन्हा राज्य सरकारकडे पाठपुरावा करत राहिलो व त्यांचा अध्यादेश आला ते म्हणजे शिवाजीनगर नामांतरण करण्याचा.

पत्रकाराशी बोलताना भाजप नगरसेवक दत्तात्रय रेंदाळकर म्हणाले की 4 वर्षात खासदार संजयकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगरला सव्वा कोटीचा निधी देण्यात आला त्यामध्ये तासगाव ते शिवाजीनगर डांबरी रस्ता 60 लाख, अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण 25 लाख, शिवाजीनगर स्मशानभूमीसाठी 15 लाख, व इतर विविध कामासाठी निधी आणला.

यावेळी कार्यक्रमास भाजप नगरसेविका रुपाली गावडे,भाजप नेते नवनाथ साळूखे,तंर राष्ट्रवादीचे ताजूद्धीन तांबोळी, विश्वास पाटील, राष्ट्रवादी नगरसेवक बाळू सावंत अभिजीत माळी,ओबिसीचे जिल्ह्याध्यक्ष करन पवार, अमोल शिंदे,

राहुल शिंदे अभिजीत पाटिल

एम बी पवार, दिनकर पाटिल, चंदू पाटील,व इतर उपस्तिथ होते


राजकीय जुगलबंदी आमदारांच्या व्यासपीठावर

राष्ट्रवादीचे राहुल शिंदे भाषण करत असताना स्व आर आबा व आमदार सुमनताई यांच्या कामाचा पाढा वाचत असतानाच

राहुल शिंदे हे भाजपचे नगरसेवक दत्तात्रय रेंदाळकर यांना म्हणाले की तुम्ही खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून निधी आणा व मी आमदार सुमनताई कडून निधि आणतो शिवाजीनगर   तासगांव शहरात एक नंबर करूया. तर खाली बसूनच भाजपचे नगरसेवक दत्तात्रय रेंदाळकर यांनीही सांगितले की मी खासदार संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निधी आणून शिवाजीनगरचां चेहरा मोहरा बदलू.

पण कार्यक्रमात भाजप व राष्ट्रवादीचे नगरसेवक एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कार्यक्रम पत्रिकेमध्ये पालकमंत्री जयंत पाटील खासदार संजय काका पाटील आमदार सुमनताई पाटील एकत्र नावे असल्याने अनेकांनी शिवाजीनगर कडे धाव घेतली गर्दी केली होती. परंतु पालकमंत्री जयंत पाटील व खासदार संजय काका पाटील हे कार्यक्रमास उपस्थित राहिले नाही

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies