माझं गाव ,माझं तीर्थ उपक्रमांतर्गत कसबे तडवळे येथे करण्यात आले वृक्षारोपण.
राम जळकोटे-उस्मानाबाद
उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील क्लासमेट ग्रुप १९९८-१९९९ वर्षातील सर्व तरुणवर्ग एकत्र येऊन जयहिंद विद्यालय समोरील रस्त्याच्या बाजूस १७ वृक्षाची लागवड करण्यात आली.सोबत या वृक्षांना ट्री गार्ड ही बसवण्यात आले. आपण लावलेल्या वृक्षाला कसलाही धोका वा इजा होऊ नये यासाठी ही ट्री गार्ड संकल्पना राबविण्यात आली. माझं गाव,माझं तीर्थ ह्या उपक्रमांतर्गत हे वृक्षारोपण करण्यात आले.
यासाठी उपस्थित पोलीस उपनिरीक्षक. महेश लांडगे, विशाल जमाले, सचिन जमाले, हनुमंत होगले, अमोल पवार, अभिजित करंजकर,महेश निंगुळे, अप्पा मणके, प्रा. अतुल हिंगमीरे,नाना माने,प्रीतम भालेराव, अमर घोरपडे,डिगंबर लोहार बालाजी जमाले,संतोष कापसे,समीर कोरबू ,बालाजी बोरकर ,बाळू श्रीरसागर,किशोर लोहार ,सोमनाथ माळी,संतोष माळी ,इकबाल कोतवाल, मल्हारी गावखरे सह आदी तरूण वर्ग उपस्थित होते.