राष्ट्रीय सेवा योजनेला नवी दिशा देणार - प्रा.अभय जायभाये
राजू थोरात-तासगाव
राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी स्वावलंबी असतो त्यांच्या मार्फत शासनाच्या योजना समाजापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करून राष्ट्रीय सेवा योजनेला नवी दिशा देणार असे उद्गार शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा.अभय जायभाये यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय,तासगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हास्तरीय वार्षिक नियोजन व उद्बोधन बैठकीत बोलताना काढले ते पुढे म्हणाले कार्यक्रम आधिकारी यांना तणावमुक्त करायला पाहिजे. आपल्या अनुभवाचा वापर करून प्रत्येक समस्येवर उत्तर शोधता येते. शिवाजी विद्यापीठात एन.एस.एस. भवन उभा करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे म्हणाले राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा सक्षम असला पाहिजे.कल्पक व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजोपयोगी कामे करावीत असे सांगून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने राबविलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ.बी.टी. कणसे यांनी आपल्या मनोगतातून एन.एस.एस.मध्ये काही बदल सुचविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक प्रा.सदाशिव मोरे यांनी केले. तर आभार कार्यक्रम आधिकारी डॉ.टी.के.बदामे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.के.खाडे , कार्यक्रम आधिकारी डॉ.पी.बी.तेली, डॉ.अमोल सोनवले, शिवाजी विद्यापीठातील किरण पवार, सुजित मुंढे, आशितोष मगदूम, नाझिया शेख, अनिता घाटगे,राहुल मुळीक तसेच डॉ.अजय अंभोरे,डॉ.मेघा पाटील आणि सांगली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून आलेले कार्यक्रम आधिकारी आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिवसभरात तीन सत्रामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.