अखेर ती पैसे स्वीकारणारी महिला वाहतूक पोलीस निलंबित...!
गृहराज्यमंत्र्यांनी अशा अनेक लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करणे आवश्यक
मिलिंद लोहार-पुणे
शगुन चौकात एका वाहतूक पोलीस महिलेने कारवाई न करण्यासाठी एका तरुणी कडून पैसे थेट खिशात घेतले या व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता याबाबत वाहतूक पोलिसांकडून कसोली अहवाल सादर केल्यानंतर संबंधित वाहतूक पोलिस महिलेचे निलंबन करण्यात आले आहे स्वाती सोन्नर असे निर्माण झालेल्या वाहतूक पोलीस महिलेचे नाव आहे त्या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत सोन्नर आणि त्यांचे सहकारी वाहतूक पोलीस मंगळवारी दिनांक 15 पिंपरी मधील साई चौकात कर्तव्य बजावत होत्या दरम्यान तिथे एका दुचाकीवरून दोन तरुणी आल्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचे संबंधित वाहतूक पोलीस मध्ये त्यांना सांगितले ही कारवाई टाळण्यासाठी काही रक्कम घेण्याचे ठरले त्यानंतर पोलीस महिलेने ती रक्कम स्वीकारली
: मात्र यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पोलीस दलाला असलेला पगार पुरत नाही का ?सामान्य जनता अगोदरच कोरोनाच्या विळख्याने त्रासलेले आहे त्यात पोलिस कारवाई करताना कागदपत्रे तपासली जातात मात्र संपूर्ण पुणे शहरात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पोलीस कारवाई करताना अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समजते मात्र रस्त्याला उभे असणारे अजून किती जण अशा वेगवेगळ्या पद्धतीने पैसे घेत असतील तरी महिला पोलिसांनी तरी असे करणे योग्य नाही असे नागरिकांमधून बोलले जात आहे समाजामध्ये पुरुषांच्या बरोबरीने उभ्या असलेल्या महिलांना पोलीस दलात मोठ्या दिमाखात भरती करून आपण स्त्रियांना बरोबरीचा हक्क देत असतो मात्र अशा कारणाने चांगल्या महिला अधिकारी यांचेही नाव यामुळे मलिन होत आहे तसेच ट्रेनिंग घेऊन येणाऱ्या नवीन महिलांना पोलीस दलात चांगल्या प्रकारचा संदेश येणे आवश्यक आहे हे अशा महिलांना चांगलाच चाप लावणे गरजेचे आहे जेणेकरून पोलीस दलामधील सर्व अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी यांनी लाच स्वीकारली गेली नाही पाहिजे तरी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे तसेच गृहराज्यमंत्री ग्रामीण शंभूराजे देसाई यांनी यामध्ये लक्ष घालावे असे सामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे