रस्त्यावर वाहने उभी केल्यामुळे बुधवार बाजाराला वाहतूक कोंडी
अमूलकुमार जैन-मुरुड
सदर बाजारात आपला माल विक्रीला आणणारे काही दुकानदार येथिल रस्त्यालगतच आपल्या हातगाड्या तसेच काही भाजी विक्रेते आपली दुकाने उभारतात त्यामुळे खरेदीसाठी येणारी गिऱ्हाईक मोठ्या प्रमाणातत गर्दी करतात.येथिल रस्ताही अरुंद असून एका बाजूला खोलगट शेत जमिन तर दुसर्या बाजूला खाजण जमिन असून रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करुन ठेवल्यामुळेव मुरुड-अलिबाग रस्त्यावर आधीच वाहनांची मोठी वर्दळ असते तसेच बाजाराच्यालगतच असलेल्या अरुंद उघडीमुळे विशेषतः सायंकाळच्या सुमारास येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते. येथे दोन महिला होमगार्ड व एखादा पोलिस बंदोबस्ताला ठेवलेला असला तरीही बराच वेळ वाहतूक कोंडी होत असते.तरी उसरोली ग्रामपंचायत व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचार्यांनी रस्त्यालगतची दुकाने आतील भागात थाटण्याकडे लक्ष देण्याची तसेच वाहनांसाठी शेतजमिनीवर वाहनतळ उभारण्याची मागणी येथिल नागरिक करीत आहेत.
खारीकवाडा येथे भरण्यात येणाऱ्या आठवडा बाजारामध्ये येणाऱ्या विक्रेते यांच्याकडून कृषी बाजार समिती ही कर वसूल करत असते त्यामुळे त्यांनी येथे येणाऱ्या विक्रेते आणि ग्राहक यांच्या वाहनांसाठी वाहनतळ उभारणे ही त्यांची जबाबदारी आहे.कारण विक्रेते आणि ग्राहक हे त्यांची वाहने रस्त्यावर उभी करीत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.त्यामुळे एखादं वेळी एखादी रुग्णवाहिका रुग्णास घेऊन आली अन त्या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडल्यास त्यामध्ये असणाऱ्या रुग्णाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार?असाही सवाल उपस्थित होत आहे.त्याचप्रमाणे या आठवडा बाजार समोर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे यांचे तरी भान ठेवणे गरजेचे आहे.तरी सदर बाजार हा येथून उचलून तो उसरोली गावात जाणाऱ्या रस्त्यावर हलविणे गरजेचे आहे.अशीही मागणी होत आहे
खारीकवाडा येथे भरण्यात येणाऱ्या आठवडा बाजारात खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या ग्राहक आणि विक्रेते यांची वाहने यांनी रस्त्यावर उभी न करता ती वाहने अशा ठिकाणी उभी करावी जेणे करून वाहतूक ही कोंडी न होता सुरळीत राहील, याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे.मनीष नांदगावकर. सरपंच, ग्रुप ग्राम पंचायत, उसरोली-मुरूड
अमूलकुमार जैन