सावळज ग्रामपंचायत निवडणुकीत होणार काटे की टक्कर;शिवसेनेकडून स्वतंत्र पँनल उभा .
राजू थोरात-तासगाव
तासगाव तालुक्यातील 39 ग्रामपंचायत रणधुमाळी सुरु झाली आहे.अर्ज भरणेही सुरु झाले आहे.सावळज ग्रामपंचायत आमदार सुमनताई आर पाटील यांचे होमपिच आहे.तरीही सावळज मध्ये भाजपची एक हाती सत्ता आहे.
सावळज मध्ये वार्ड 1 मध्ये शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख अनिल तानाजी शिंदे व वार्ड 3 मध्ये शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सदींप मारुती मस्के यांनी अर्ज भरला आहे.
अर्ज भरताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोलभैया काळे, सावळज शहर प्रमुख सुनील पाटील, श्रीकांत शिंदे,सुनील मगदूम, गजानन पाटील, प्रताप निकम ,संजय उनवणे,पिंटू कुंभार आदी उपस्तिथ होते.
यावेळी उमेदवार शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख अनिल तानाजी शिंदे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले शिवसेना पूर्ण ताकदीने सावळज ग्रामपंचायत लढवु.
शिवसेना तासगांव तालुका प्रमुख अमोलभैय्या काळे हे वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतील तो मान्य आहे.