तासगाव/ मांजर्डे गावात निवडणूकीवरुन हमरी-तुमरी
राजू थोरात- तासगाव
मांजर्डे गावात निवडणुकीवरून हमरीतुमरी झाली आहे. तासगाव पोलिसांनी एनसी दाखल केली आहे. याबाबत तासगाव पोलिसांनी माहिती दिली अशी की रोहित रामचंद्र मोहिते यांनी तासगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीमध्ये म्हटले आहे की अमितकुमार ज्ञानेश्वर पाटील,
महेश तानाजी साळुंखे, सुशांत बाळासो पाटील,बनिषा करीम अत्तार,यांनी निवडणुकीत आमच्या सोबत रहा. अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही व शिवीगाळ करून दमदाटी केली आहे. यां एनसीचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके हे करीत आहे
तर दुसरी तक्रार महेश तानाजी साळुंखे माजर्डे यांनी दिली आहे.
संभाजी कृष्णा कुंभार, शिवाजी रामचंद्र मोहिते,सचिन गणपतराव पाटील,आमर रामचंद्र मोहिते,यांनी निवडणुकीत आमच्या बरोबर रहा.आमच्या पॅनल बरोबर रहा अन्यथा तुला जिवंत ठेवणार नाही व शिवीगाळ दमदाटी केली आहे.
सदर दोन्ही एनसीसीचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके हे करीत आहे