मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर लक्झरी बसला लागली भीषण आग बस जळून खाक, सुदैवाने जीवित हानी नाही
दत्ता शेडगे-खालापूर
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर खालापूर टोल नाक्याजवल मुबंई लेन वर रात्रीच्या सुमारास एका लक्झरी बस ला भीषण आग लागली असून या आगीत बस पुर्णपणे जळुन खाक झाली,
पुण्याहून मुबंई कडे ही बस जात असताना ती खालापूर टोल नाक्याजवल आली असता अचानक तिला आग लागली या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली मात्र या बस मधे कोणीही प्रवाशी नसल्याने मोठी घटना टळली, तर चालक वेळीच खाली उतरल्याने तोही बचावला,
या घटनेची महिती मिळताच आयआरबी च्या दोन फायर ब्रिगेड ,व खोपोली नगरपालिकेची एक फायर ब्रिगेड तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न केले