मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात दोन जण जागीच ठार
Team Maharashtra Mirror1/10/2021 07:53:00 AM
0
मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात दोन जण जागीच ठार
ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रकने दिली समोरील ट्रकला जोरदार धडक
एक्सप्रेस वेवरील आजचा दुसरा अपघात....
दत्ता शेडगे-खालापूर
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ ट्रक चा ब्रेक फेल झाल्याने ट्रक ने समोरील ट्रक ला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक मध्ये एक जण अडकला होता तर एकाने रस्त्यावर उडी मारून गंभीर जखमी झाले ,मात्र काही वेळाने दोघांचा मृत्यू झाला, एक्सप्रेस वेवरील हा दुसरा अपघात आहे
पुण्याहुन मुबंई कडे नारळ घेऊन ट्रक जात असताना तो एक्सप्रेस वेवरील आडोशी बोगद्याजवळ आला असता त्याचा ब्रेक फेल झाल्याने तो भरधाव वेगात जाऊन समोरील ट्रक ला जोरदार धडक भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक मधील दोन जण जागीच ठार झाले आहेत,
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील आजचा हा दुसरा अपघात आहे