मिरजेचे प्रकरण ताजे असतानाच;;-तासगांव तालुक्यातील कवठेएकंद मध्ये अल्पवयीन मूलीवर बलात्कार
राजू थोरात- तासगांव
मिरज येथे मुलीवर गूंगीचे इंजेक्शन देऊन मुलीवर बलात्कार केला हे प्रकरण ताजे असतानाच
तासगांव तालुक्यात कवठेएकंद येथे खळबळजनक घटना घडली.कवठेएकदं मध्ये आरोपी अंकुश सदाशिव गुजले रा कवठेएकंद ह्याने आपली पूतणी अंकलखोप राहायला होती.तीला आपल्या कवठेएकंद मध्ये दिनांक 29 रोजी रात्री 10-30 ला आपल्या घरी बोलवले व दारू पाजुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
आरोपी अंकुश गुजले याने ह्या अगोदर पुतणीवर 2 वेळ बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्याबाबत प्रज्ञा अमरसिंग देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक महिला कक्ष जिल्हा निर्भया पथक यांनी फिर्याद दिली आहे.तर या गुन्ह्याचा अधिक तपास तासगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम हे करीत आहेत.
काल मिरज नंतर आज तासगांव मध्ये बलात्कार झाल्यामुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे