पुणे शहर ओबीसी मोर्चाच्या उपाध्यक्षपदी स्मिता गायकवाड यांची नियुक्ती
मिलिंद लोहार-पुणे
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तर्फे "स्मिता तुषार गायकवाड" यांना पुणे शहर ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपद नियुक्तीचे प्रमाणपत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमाला भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर,भाजपा पुणे शहर अध्यक्ष . जगदीश मुळीक,भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहर अध्यक्ष .योगेश पिंगळे,पुणे महापालिकेचे नगरसेवक माजी सभागृह नेते . धीरज घाटे,राजेश पांडे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला प्रचंड संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.