आणि चक्क साप घटाघटा पाणी प्याला.....!
महाराष्ट्र मिरर टीम -खोपोली
नाग रेस्क्यू करताना अमोल ठकेकर यांनी त्याची भागवली तहान. खालापूर आणि खोपोली शहरातील स्नेक रेस्क्युअर्स दररोज मानवी वस्तीत वावरणाऱ्या सापांना रेस्क्यू करून सुरक्षित वन क्षेत्रात सोडत असतात. अश्याच एका कॉलवर ऑपरेशन पार पाडत असताना अमोल ठकेकर यांना त्यांनी पकडलेला नाग जातीचा साप थकलेला जाणवला. त्यांनी लागलीच त्याला मिनरल वॉटर बॉटलमधून पाणी पाजण्याचा प्रयत्न केला आणि अक्षरशः नागराज चक्क घटाघट पाणी पिऊ लागले.
हे दृश्य वर वर खूप विलोभनीय दिसत जरी असले तरी कोणी तसा प्रयत्न करू नये. अमोल ठकेकर सारख्या सर्प मित्रांनी असे शेकडो साप रेस्क्यू केलेले असल्याने सापांची सखोल माहिती आणि त्यांना हाताळण्याचा सराव असल्यानेच त्यांना ते शक्य होते.
रेस्क्यू ऑपरेशन पार पाडत असताना एखाद्या वेळी असं आश्चर्यकारक दृश्य वेगळी अनुभूती देऊन जातं.
अमोल ठकेकर हे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमचे सदस्य आहेत.