महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेश मुथा यांची नियुक्ती
तरोनिश मेहता-पुणे
महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेश मुथा यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारणीमध्ये सचिव – जयेश अकोले, सामाजिक सचिव – संकेत सुरी, खजिनदार- शशिकांत वाकडे, संचालक – समीर गांधी, संचालक - रोहन उपसानी, संचालक – संजय कुलकर्णी, संचालक - संजय देशमुख, कार्यकारणी सदस्य नरेंद्र पवार यांची निवड झाली आहे. पुर्वीचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी राजेश मुथा यांच्याकडे पदभार दिला. यावेळी कुलकर्णी यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामांचा आढावा सादर केला.
राजेश मुथा म्हणाले, मास्मा (महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन) सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच केवळ शहरी भागातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील सोलर उत्पादक व सेवा पुरवणा-यांची सभासद नोंदणी करणे. यासाठी तालुका समन्वयक, जिल्हा समन्वयक, जिल्हा संचालक, विभागीय संचालक अशा ५ गटात विभागणी करण्यात येत आहे. मास्मा सदस्यांच्या सार्वांगिण विकासासाठी विविध कार्यशाळा आणि कार्यक्रम राबविले जाणार आहेत. विशेष सल्लागारांची नेमणुक, सोलर वापरकर्त्यांना चांगली आणि गुणवत्तापुर्ण सेवा मिळावी यासाठी सर्व स्तरावर चाचणी करुन ‘मास्मा सर्टीफाइड इन्टॉलेशन’ संकल्पना राबविणे, नेटमिटरिंग मध्ये सुसुत्रता आणण्याबरोबर जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. ‘एक देश, एक धोरण’साठी प्रयत्नशील असण्याबरोबर सौरउर्जा धोरण बणविण्यासाठी केंद्र सरकार आणि प्रशासकिय पातळीवर मार्गदर्शक मदत करणे. ग्राहक आणि उत्पादक असोसिएशनबरोबरच पर्यावरण आणि सौरउर्जा विषयात काम करणा-या संस्थांशी सलग्नता वाढवण्यावर नविन कार्यकारणीचा भर असल्याची माहिती मुथा यांनी दिली.