गळफास घेऊन डॉक्टरची आत्महत्या सातारा येथील संभाजीनगरमधील घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ ; गूढ कायम
प्रतिक मिसाळ-सातारा
सातारा येथील संभाजीनगरमधील एका डॉक्टरने राहत्या घरात असणाऱ्या ओपीडीतच गळफास घेवून आत्महत्या केली . ही घटना दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली . या घटनेमुळे परिसरासह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे . डॉ . दिगंबर रघुनाथ पवार ( वय ५६ , रा . संभाजीनगर , सातारा ) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे . त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही . डॉ . दिगंबर पवार यांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी असणाऱ्या ओपीडीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली . या घटनेची माहिती त्यांच्या पत्नी डॉ . दीपाली पवार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली . पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चिठ्ठी अथवा काही संशयास्पद सापडतेय का , हे तपासले . परंतु घरात पोलिसांना काहीही सापडले नाही . त्यामुळे डॉ . पवार यांच्या आत्महत्येबाबत गूढ वाढले आहे .