मुरुड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र मिररचे प्रतिनिधी अमूलकुमार जैन यांची निवड
अरुण जंगम-म्हसळा
मुरुड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी अमूलकुमार जैन यांची निवड झाली आहे.अमूलकुमार जैन यांना अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचा मुरुड तालुका पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष संजय करडे यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन करीत त्यांना त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नवनिर्वाचित कार्यकारिणी उपाध्यक्ष सिराज शेख,सचिव सुधीर नाझरे यांच्यासाहित संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते