Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

श्रीमंत महाराज कुमार रोहितराजे देशमुख पवार, सुरगाणा यांचा नुकताच वाढदिवस संपन्न

 श्रीमंत महाराज कुमार रोहितराजे देशमुख पवार, सुरगाणा यांचा नुकताच वाढदिवस संपन्न

सुरेश चव्हाण-नाशिक


श्रीमंत महाराज धैर्यशीलराव यंशवतराव देशमुख पवार यांचे वंशज श्रीमंत महाराज कुमार रोहितराजे देशमुख पवार यांचा वाढदिवस हा अत्यंत साधेपणाने सुरगाणा येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी  महाराज कुमार श्रीमंत रोहितराजे देशमुख पवार यांचे वर आधारीत एक छोटासा माहितीपट देखील प्रकाशित करण्यात आला. नाशिकचे चित्रपट दिग्दर्शक सुरेश चव्हाण यांनी याची निर्मिती केलेली आहे.  लहापणापासूनच त्यांच्यावर झालेल्या राजघराण्याच्या संस्कारामुळे पूजापाठ करणे, वेद, पुराण, भगवद्गीता या धार्मिक बाबींमध्ये अत्यंत रुची आहे, त्यामुळे त्यांनी आधुनिक विज्ञान व पारंपरिक धर्म या दोघांमध्ये सुंदर समन्वय साधण्याची कला अवगत केली आहे, सध्या ही, ध्यान धारणा करणे हे त्यांच्या जीवनाचे एक अविभाज्य अंग बनले आहे. त्यांचे हायस्कूलचे शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूल व फर्वशी अकॅडमी नाशिक येथे झाले त्यानंतर त्यांनी पुणे येथील सिम्बायोसिस कॉलेज मधून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली व त्याच कॉलेज मधून MBA IN MARKETING AND HUMAN RESOURCE MANAGEMENT मधून उच्च शिक्षण प्राप्त केले, तसेच ते विविध कोर्सस साठी परदेशात जाऊन आलेले आहेत. मोठ्या राज घराण्यातून येऊन सुद्धा त्यांनी अनुभवकामी प्रथम अनेक वर्षे एचडीएफसी बँक येथे व नंतर  MIT COLLEGE पुणे येथे Director Head Public Relation and Corporate Communication म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

सध्या ते Mind and Soul Science मध्ये प्रयोग करीत आहेत व त्यांचे अनेक शहरांमध्ये आवड म्हणून Classes घेत असतात, त्यांचे असे म्हणणे आहे आजच्या धकाधकीच्या युगात नवीन पिढीला मार्गदर्शन करण्याची अत्यंत गरज आहे, सुरगाणा संस्थान मधील लोकांच्या मध्ये धर्म आणि संस्कृती बद्दल जाणीव निर्माण व्हावी व त्यांच्या जीवनात सुख, शांती, समाधान यावे व त्यांची प्रगती व्हावी यासाठी ते धडपड करत असतात त्यांचे असे म्हणणे आहे की मनुष्य जात हाच सर्वात श्रेष्ठ धर्म आहे व यावर त्यांची अतूट श्रद्धा आहे.

     श्रीमंत महाराज कुमार रोहितराजे देशमुख पवार हे अत्यंत दृढदृष्टी असलेलं व्यक्ती मत्व आहे. अजून काय बोलणार त्यांच्याबद्दल. ग्रामीन भागातील लोक असो वा शहरी भागातील लोक मग त्यात सर्वच वयोगटातील माणसं आली की ज्यांनी मानवता धर्म स्वीकारून माणसासारखे जगावे यासाठी त्यांचा वेगवेगळ्या प्रकारचे मोटिव्हेशनल व्हिडिओ पण तयार करण्याचा मानस देखील आहे. परदेशात शिक्षण घेऊन सुद्धा भारतीय संस्कृती आणि आचार, विचार आणि आध्यात्मिक वारसा ते जपत आहेत. राजघराण्यातील असून देखील कुठल्याही प्रकारे त्याचा अभिमान नाही, सर्वसामान्य माणसात मिसळून त्यांचे सुखदुःख जाणून घेतात, सकाळी एकदा बाहेर पडले की दिवसभरात अनेक लोक भेटतात,  त्यांचेशी हितगुज करणे, समस्या जाणून घेणं, यथायोग्य मदत करणं, आधार देणं हा तर त्यांचा खूप मोठा कार्यभाग आहे. त्यांची ओळख खर तर त्यांच्या कामातूनच आहे, त्यांच्या वर्तणुकीतुनच आहे. 

    प्रचंड दूरदृष्टी, आध्यात्मिक ज्ञान, सामाजिक जबाबदारी असलेल्या श्रीमंत महाराज कुमार रोहितराजे देशमुख पवार यांच्याबद्दल जेवढं लिहावे तेवढं कमीच आहे परंतु ते करत असलेल्या कामास आपण देखील प्रतिसाद देणं आणि त्यांना अपेक्षित बदल आपण आपल्यात करणं हेच आपण त्यांना त्यांच्या वाढदिवशी गिफ्ट दिल्यासारखं होईल असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं.

     याप्रसंगी विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून पुढील वाटचालीस महाराज कुमार श्रीमंत रोहितराजे देशमुख पवार यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies