आनेवाडी टोलनाका आंदोलनाच्या गुन्ह्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह १७ जणांची आज निर्दोष मुक्तता
प्रतिक मिसाळ -वाई
आनेवाडी टोलनाक्यावर नियमबाह्य टोल वसुली विरोधात केलेल्या आंदोलनाच्या गुन्ह्यातून आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह १७ जणांची सबळ पुराव्याअभावी वाई न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता केली.
पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था
झालेली असताना, तसेच आवश्यक सेवासुविधा मिळत
नसतानाही आनेवाडी टोलनाक्यावर टोल वसुली होत
असल्याने महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्या विरोधात शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या समर्थकांनी दि १८ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन केले होते.या वेळी साताऱ्याकडून विरमाडे (ता. वाई) गावाकडे टोलनाक्याचे लेन क्रमांक एकच्या बाजूस कठड्यावर शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांचे समर्थक फिरोज पठाण, जितेंद्र सावंत, मिलिंद कदम, सर्जेराव सावंत, जयश्री गिरी,सरिता इंदलकर, विद्या देवरे, कांचन साळुखे, जितेंद्र कदम,सुहास गिरी, धनंजय जांभळे, नासीर शेख, अशोक मोने,अमोल कदम, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, अमोल मोहिते आणि ऐंशी लोकांनी नाक्यावरील टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न केला. टोल नाक्यावर बसून विरोधी घोषणा देत निदर्शने केली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला म्हणून भुईंज पोलीस ठाण्याततील पोलिस कर्मचारी धनाजी तानाजी कदम यांनी सर्व आंदोलकांच्या विरोधात भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.याची वाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह १७ जणांची सबळ पुराव्याअभावी वाई न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता केली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांच्यावतीने न्यायालयात बाजू अॅड. शिवराज धनवडे, अॅड.आर.डी. साळुंखे, अॅड.संग्राम मुंढेकर, अॅड.प्रसाद जोशी तर सरकार पक्षाच्यावतीने अॅड.मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले.