अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी पुणे बेंगलोर हायवे वरील कराड येथील घटना
कुलदीप मोहिते --कराड
मंगळवारी रात्री पुणे बेंगलोर महामार्ग नजीक पाचवड फाटा नांदलापूर कराड येथे अज्ञात वाहनाने धडक देऊन बिबट्या जखमी झाला बिबट्या जखमी झाला असल्यामुळे त्याला जागेवरुन हलता येत नव्हते त्यामुळे काही वेळ तो एकाच जागी बसून होता त्यामुळे महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्यां प्रवाशांनी त्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती गर्दीला बघून बिबट्याने नजीकच्या शेतात जखमी अवस्थेत लगेच धूम ठोकली