Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

तासगाव मधील सर्पमित्र स्व संजय माळी यांच्या कुटुंबाला तालुक्यातील अर्थमूव्हर्स व सप्लायर्स डंपर व्यावसायीकांनी केली आर्थिक मदत;माळी कुटुंबाला मद्त करावी भावनीक आवाहन

 तासगाव मधील सर्पमित्र स्व संजय माळी यांच्या कुटुंबाला तालुक्यातील अर्थमूव्हर्स व सप्लायर्स डंपर व्यावसायीकांनी  केली आर्थिक मदत;माळी कुटुंबाला मद्त करावी भावनीक आवाहन

राजू थोरात- तासगाव 



तासगाव शहरासह तासगाव तालुक्यामध्ये कोणत्याही ठिकाणी सर्प निघाला तर नागरिक, शेतकरी,सर्पमित्र संजय माळी यांना फोन करत असत. अहो रात्री सुद्धा संजय माळी फोन आला की सर्प पकडायला जायचे.

मागील आठवड्यात चिंचणी तालुका तासगाव येथे एका द्राक्ष बागेमध्ये अति विषारी घोणस पकडताना दंश केल्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तासगाव तालुक्यासह तासगाव शहरात शोककळा पसरली.

त्यानंतर स्व संजय माळी यांचे कुटुंब संपूर्ण उघड्यावर पडले. स्वर्गीय संजय माळी यांच्या घरामध्ये दोन मुली शिक्षण घेत आहेत तर आई वयस्कर असून औषध उपचार चालू असून अंथरुणाशी खिळुन आहेत.तर बायको गृहणी म्हणून घरिच आहेत.तर मुलगा चालक म्हणून काम करत आहे.

स्वर्गीय संजय माळी यांनी संपूर्ण आयुष्य सर्प पकडण्यात घालवले. सर्प पकडल्यानंतर ते निर्जनस्थळी सोडत असत. परंतु सर्प पकडतानाच अति विषारी घोणस जातीच्या सर्पाने दंश केल्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला. दंश होतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडल्यानंतर काही सर्पमीत्र तर सेवाभावी संस्था ह्या पुढे येऊन आर्थिक मदत करू लागले.

दी 8 रोजी तासगाव मधील अर्थमूव्हर्स व सप्लायर्स या डंपर व्यवसायिकांनी सर्पमित्र स्वर्गीय संजय माळी यांच्या कुटुंबाला तब्बल 51 हजाराची मदत देऊन एक माणुसकी जोपासली आहे.

तासगावचे माजी नगराध्यक्ष अविनाशकाका पाटील व चिंचणीचे युवा नेते अमितभैया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अवधूत शिंदे मणेराजुरी यांच्या सहकार्याने सागर हाके, गणेश दरेकर, सतीश माळी, जतीन शेळके, सागर पाटील, सागर पवार, साजिद हकीम, गुणवंत माळी निरंजन पवार सागर हांडे,विकास झांबरे, समीर पठाण  अजित पाटील हे सर्व एकत्रित येऊन सर्पमित्र स्वर्गीय संजय माळी यांच्या कुटुंबाला धीर देऊन 51 हजाराची मदत केली.

51 हजाराची मदत घेताना माळी कुटुंबाचे व उपस्थितांचे डोळे पाणावले होते.



भावनिक आवाहन
माजी नगराध्यक्ष अविनाश काका पाटील व चिंचणीचे युवा नेते अमित भैया पाटील, व तासगाव मधील अर्थमूव्हर्स व सप्लायर्स डंपर व्यवसायिकांनी आव्हाहन केले आहे की स्वर्गीय संजय माळी यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यांच्या दोन मुली शिक्षण घेत आहेत ,आई,वयस्कर आहे सर्वांनी त्यांना कोणत्याही रूपाने मदत करावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies