Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कुलकर्णी दांपत्य "कम्युनिटी कॉन्ट्रीबुशन अवॉर्डने सन्मानित

 कुलकर्णी दांपत्य "कम्युनिटी कॉन्ट्रीबुशन अवॉर्डने सन्मानित

ज्ञानेश्वर बागडे-
महाराष्ट्र मिरर टीम



*इतकेच ठावे मजला,प्रकाश द्यावा सकला*,

*कसलेही मज रूप मिळो*

*देह जळो अन जग उजळो*

या पंक्ती आपल्या आजूबाजूच्या फार कमी व्यक्तीना लागू होतात! "स्वतःचा विचार आधी मग इतरांचा" ही तर जगरहाटी..याला अपवाद कुलकर्णी दाम्पत्य!!

 प्रदीप कुलकर्णी व प्रीती कुलकर्णी यांच्या अंगी असणारा हा समर्पण भाव ओळखून "कोटक  लाइफ" या ग्रुपने यांना community contribution Award देऊन सन्मानित केले.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या व्यक्तींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता grass root लेव्हल वर काम केले अशांचा शोध घेताना सादची माहिती त्यांना मिळाली.



    साडेनऊशे कुटुंबापर्यंत पोहोचणारी ही संस्था व त्याची धुरा सांभाळणारे श्री व सौ कुलकर्णी यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.

  सादचे सर्व सभासद व इतर सदिच्छा देणारे हितचिंतक यांनी  या दाम्पत्याचे व सादचे  मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies