मुरबाड मधील शिरवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका आगिवले
अवघ्या 21 वर्षाच्या तरुणीला सरपंचपदाचा मिळाला मान
सुधाकर वाघ-मुरबाड
मुरबाड तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीमध्ये युवा नेतृत्व अक्षय आगिवले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 9 सदस्या पैकी 6 सदस्य निवडुन आणुन आपले बहुमत सिद्ध केले आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणुक बुधवारी (ता.10) रोजी पार पडली. या निवडणुकी मध्ये सर्वात तरुण सरपंच कु.सारिका बारकु आगिवले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायत सरपंचपदी कु. सारिका बारकु आगिवले यांची (वय 21 वर्ष ) सर्वात कमी वयाची तरुण सरपंच पदी निवड झाल्याच्या यादीत मान मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मुरबाड तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी सारिका आगिवले व उपसरपंच पदासाठी पमा दत्तात्रय खैर यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. सारिका आगिवले बिनविरोध सरपंच पदी विराजमान झाल्याबद्दल सर्वस्तरांतुन कौतुक केले जात आहे.