काक्रम्बा येथे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तनाचे आयोजन.
राम जळकोटे-उस्मानाबाद
तुळजापूर तालुक्यातील मौजे काक्रम्बा येथील जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती कुसुम ताई बंडगर यांच्या संकल्पनेतून नव वर्षानिमित्त शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी रोजी समाज प्रबोधनकार ह. भ. प. श्री. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची किर्तन सेवा सायंकाळी 5 ते 7 या वेळेत आयोजित करण्यात आलेली असुन या समाज प्रबोधनपर किर्तन रुपी सेवेचा तालुक्यातील जनतेनी लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक युवा नेते श्री. बालाजी बंडगर यांनी केलेले आहे.आजच्या तरुण पिढी मध्ये वाढते व्यसनाचे प्रमाण ; थोरामोठयांचा होणारा अनादर ; जमिनीच्या वादातून होणारे भावा भावाचे वाद ; गुरुभक्ती ; मित्र प्रेम या पासून परावलंबीत झालेली तरुण पिढी चांगल्या मार्गाला प्रवाहित व्हावी हा उद्देश बाळगून समाज प्रबोधन कीर्तनकार ह. भ. प. श्री. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केलेले आहे तरी तुळजापूर तालुक्यातील नागरिकांनी विशेष तरुण वर्गानी या समाज प्रबोधन पर कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते बालाजी बंडगर यांनी केलेले आहे.