कोरोना संकटकाळात उत्कृष्ट सेवा कार्य केल्याबद्दल उद्योजक डॉ.ओंकार हेर्लेकर यांचा राज्यपालांच्या हस्ते झाला विशेष सन्मान
ओंकार रेळेकर-चिपळूण
देशात आलेल्या महाप्रलंयकारी कोरोना संकट काळात शासनाच्या आवाहनाला साथ देत अत्यंत मौल्यवान सहकार्य करणाऱ्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील लासा सुपरजनरीक प्रा.लि चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.ओंकार हेर्लेकर यांना सोमवारी राज्याचे राज्यपाल श्री.भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन राजभवन येथे विशेष सन्मानित करण्यात आले.
कोरना संकटकाळात लासा उदयोग समूहाचे मनेजिंग डायरेक्टर डॉ.श्री. ओंकार हेर्लेकर यांच्या विशेष सहकार्यातून लासा उद्योग समूहातर्फे प्रशासकीय ठिकाणी,आरोग्य यंत्रणेला आणि थेट गरजवंतांना मदतकार्य आणि आर्थिक सहकार्य करण्यात आले होते,तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्थसहाय्य ,मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर व मास्कचा पुरवठा , जिल्हा पोलिस प्रशासनाला अर्सनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यासाठी गोळ्यांचा पुरवठा केला होता. तसेच शासनाला व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्यासाठी सहकार्य केले होते. एकंदरीत कोरोनाच्या संकटात कोविड योद्धा म्हणून डॉ.हेर्लेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामाची पोच पावती म्हणून राज्यपालांच्या हस्ते त्याना सन्मानित करण्यात आले, या सन्मानाबद्दल डॉ.हेर्लेकर यांनी कृतज्ञता व्यक्त करीत आपली समाज सेवा अशीच सुरू राहील, अशी ग्वाही दिली,उद्योग व्यवसायातील सुरू असलेल्या घडामोडी आणि एमआयडीसी क्षेत्रात उद्योजकांना अपेक्षित असलेले शासनाचे सहकार्य या आणि इतर महत्वपूर्ण विषयावर डॉ.ओंकार हेर्लेकर यांची राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याशी संमाधानकारक चर्चा झाली,या वेळी डॉ.हेर्लेकर यांच्या सामाजिक कार्याबद्दल कोशारी यांनी कौतुक केले, डॉ .हेर्लेकर यांना मिळालेल्या सन्मानाबदल उद्योजक क्षेत्रातील मित्रमंडळी आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे,