मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर पाच वाहनांच्या धडकेत पाच ठार पाच जखमी
महाराष्ट्र मिरर टीम -खोपोली
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर खोपोली जवळील फुडमॉल समोर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने चार वाहनांना चिरडल्याने पाच जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत.हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला.
या अपघातात क्रेटा, इनोव्हा, टेम्पो आणि ट्रक या चार वाहनांना कंटेनरने मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झालाय.
मंजू प्रकाश नाहर,डॉ.वैभव झुंजारे, उषा झुंजारे, वैशाली झुंजारे, श्रिया झुंजारे हे पाच जण अपघातात ठार झाले असून इतर पाच जण जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीला टीमचे सदस्य,आयआरबी पेट्रोलिंग यांनी जखमीना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.