खोपोलीत आज रक्तदान शिबिर
महाराष्ट्र मिरर टीम -खोपोली
"सडक सुरक्षा अभियान २०२१" अंतर्गत "आपलं रक्तदान कोणाचा तरी जीव वाचवू शकते"* या उद्देशाला अनुसरून प्रादेशिक परिवहन कार्यालय -पनवेल ( RTO ), अल्टा लॅब्रॉटरीज लिमिटेड - खोपोली, लायन्स क्लब ऑफ - खोपोली, सर्वोदय हॉस्पिटल, समर्पण ब्लड बँक आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज दि. ६ फेब्रु, २०२१ रोजी हे डॉ. रामहरी धोटे सभागृह, लायन्स सर्व्हिस सेंटर, खोपोली येथे सकाळी १०.०० ते दुपारी २.००* वाजेपर्यंत "रक्तदान शिबीर" संपन्न होणार आहे.
आपल्या संस्थेचे उद्धिष्ट आणि हेतू या शिबिराच्या माध्यमातून संपन्न होणार असल्याने सर्वानी या उपक्रमांत वेळात वेळ काढून सहभागी होत रक्तदान करायचे आहे असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ साठेलकर यांनी केले आहे.