पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ तुळजापूर शिवसेनेचा एल्गार
राम जळकोटे-उस्मानाबाद
दि. ०५/०२/२०२१ रोजी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे तुळजापूर शिवसेनेच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या राज्यव्यापी आंदोलनाला समर्थन देत तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी मा. तहसीलदार यांना निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. कोरोनासारख्या भयंकर आजाराने तसेच अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेच्या जीवाचा खेळ या केंद्र सरकारने मांडला असून, पेट्रोल व डिझेल मर्यादेच्या बाहेर दरवाढी केल्याबद्दल तुळजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारचा यावेळी निषेध व्यक्त करण्याचे या निवेदनात नमूद केले होते.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख यांनी बोलताना सांगितले की, कोरोनासारख्या, अतिवृष्टी सारख्या संकटाने अगोदरच जनतेचे कंबरडे मोडलेले असताना केंद्र सरकारने हे आणखी एक संकट जनतेवर लादले आहे. तरी, केंद्र सरकारने लवकरात लवकर ही दरवाढ मागे घ्यावी अन्यथा यापुढेही यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन तुळजापूर शिवसेनेच्या वतीने छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. या आंदोलनादरम्यान उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण, शहरप्रमुख सुधीर कदम यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी आपापली मते व्यक्त करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.
या आंदोलनावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण, शहरप्रमुख सुधीर कदम, माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार, युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी, युवासेना जिल्हा चिटणीस लखन परमेश्वर, उपशहरप्रमुख बापूसाहेब नाईकवाडी, बाळासाहेब शिंदे, दिनेश रसाळ, ग्रा. पं. सदस्य अमिरभाई शेख, बाळू सिरसट, सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, सोशल मीडिया विभागप्रमुख तथा कार्यालयप्रमुख सिद्धराम कारभारी,शंकर गव्हाणे, चेतन चव्हाण, प्रवीण क्षीरसागर, लक्ष्मण माळी, राजकुमार कोटगीरे, रामलिंग अस्वले यांच्यासह अनेक शिवसैनिक बांधव उपस्थित होते.