Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

लिंगायत धर्माची स्वतंत्र जनगणना व्हावी,मागणीचे निवेदन

 लिंगायत धर्माची स्वतंत्र जनगणना व्हावी,मागणीचे निवेदन

सुधीर पाटील-सांगली



सन २0२१ मध्ये होणा- या जनगणनेमध्ये  लिंगायत धर्माची इतर धर्माच्या प्रमाणे स्वतंत्र जनगणना करण्यात यावी ,लिंगायत धर्माची स्थापना बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांनी केली जगाला समतेची व बंधुत्वाचा विचार महात्मा बसवेश्वरांनी जगाला दिला .अनुभव मंडपाची स्थापना करून लोकांना लोकशाहीचे महत्त्व पटवून दिले व लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म म्हणून लिंगायत धर्मास बाराव्या शतकामध्ये बिंजल राजाकडून राजमान्यता मिळवली तेव्हापासून हिंदुस्तान मध्ये अनेक शाहा मध्ये खिलजी शाही, बहामनी शाही ,मोगल शाही, बिदर शाही ,निजाम शाही, कुतुबशाही ,आदिलशाही, या सर्व राजेशाहींनी  लिंगायत धर्मास मान्यता दिली यानंतर हिंदवी स्वराज्य मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लिंगायत धर्मास पुढे राजाश्रय दिला व मान्यता दिली पुढे पेशव्यांनी ,इंग्रजांनी ,लिंगायत त्यास मान्यता दिली व इंग्रजांनी तर शासन मान्यता दिली इंग्रजांनी सण अठराशे एकाहत्तरपासून हिंदुस्तान मध्ये जनगण ने सुरुवात केली तेव्हापासून 1931 पर्यंत इंग्रजांनी लिंगायत धर्माची इतर धर्माप्रमाणे स्वतंत्र जनगणना केली . इंग्रजांनी जनगणनेमध्ये लिंगायत धर्मातील पोट जाती ,वाणी, तेली ,माळी ,साळी ,कोळी, कुंभार , कोष्टी ,ढोर, चांभार ,सुतार ,परीट अशा अनेक पोट  जाती आहेत .  इंग्रजांनी लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीची वेगळी जनगणना करून लिंगायत धर्ममास न्याय देण्याचे काम केले होते . मात्र सन 1947 स्वातंत्र्यानंतर लिंगायत धर्म हा पोरगा करून त्याची मान्यता रद्द करून लिंगायत धर्मावरती प्रचंड मोठा अन्याय केला आहे .आम्ही लिंगायत स्वतंत्र भारतामध्ये राहून सुद्धा गेली 72 वर्षे झाली आमची कोठेही गणती केली गेली नाही आम्हा लिंगायतांची महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या बारा कोटी लोकसंख्या पैकी फक्त चाळीस लाख लोकसंख्या लिंगायतांची असून लिंगायत धर्मातील सर्व जाती प्रमाणे अल्पसंख्यांक दर्जा मिळाला नाही ही फार मोठी शोकांतिका आहे ,संविधाना मधील कलम 25 कलम ,28 कलम ,29 व कलम 30 या कलमाप्रमाणे आम्हा लिंगायत मुलांना शिक्षणामध्ये व नोकरीमध्ये अल्पसंख्यांकांच्या सवलती मिळणे गरजेचे होते 72 वर्षे झाली आम्ही यापासून वंचित आहोत महाराष्ट्रामध्ये सर्व धर्मियांसाठी शासनाने महामंडळ स्थापना करून उदा . मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुस्लिमांच्या साठी मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळ ,मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास मंडळ स्थापन करून त्या - त्या धर्मातील पोट जातींना न्याय देण्याचे काम केले आहे . मात्र लिंगायत धर्माचे धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून लिंगायत धर्मातील होतकरू विद्यार्थ्यांना उद्योग करण्यास मदत केली जात नाही . हा आमच्या लिंगायत धर्मातील मुला-मुलींच्या वरती मोठा अन्याय केला जात आहे . तरी या अधिवेशनामध्ये महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करावी तरी माननीय मा .मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आमचे लिंगायत धर्मास न्याय देण्यास काम करावे ,मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या लिंगायत समाजात न्याय दिल्यास समस्त लिंगायत समाज हा आपला सदैव ऋणी राहील . तरी कृपया या चालू बजेट म्हणजे २०२०-२१ अधिवेशनामध्ये हा तातडीने विषय घेऊन लिंगायत धर्मातील सर्व पोटजाती ला न्याय द्यावा .



 त्यामध्ये  प्रमुख मागण्या -

 १ .2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये लिंगायत धर्माची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी .

२ .लिंगायत धर्म शासन मान्यता मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चालु अधिवेशनामध्ये प्रस्ताव करून विधिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठवावा .

३ . लिंगायत धर्मास अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने चालु अधिवेशनामध्ये शिफारस करून केंद्र सरकारकडे पाठवावी .

४ . महाराष्ट्र शासनाने चालूअधिवेशनामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने महामंडळाची स्थापनेची घोषणा करावी व त्यास विधिमंडळातील विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशीआमदारांनी व विधान परिषदेच्या अष्टयात्तर आमदारांनी या ठरावास एक मुखी पाठींबा दयावा .

अशा पद्धतीचे तासगांव तहसिल कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले यावेळी लिंगायत धर्म बचाव समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष भक्तराज ठिगळे , आर.डी. पाटील .डी.ए. पाटील , नवनाथ पाटील , जगदीश चौगुले , सुशांत पाटील , सुभाष अष्टेकर , संतोश बेले माळी , विलास पैलवान , सुधीर पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies