सातारा पोलिसांच्या सेवेत विविध 24 वाहनं आणि 48 मोटारसायकली पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली सुपूर्द
प्रतीक मिसाळ -सातारा
जिल्हा नियोजच्या निधीतून प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन वाहन देण्यात आले आहे . विविध प्रकारचे 24 वाहनं आणि 48 मोटार सायकली याच्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत होणार आहे . जिल्हा नियोजन निधीमधून पोलीस विभागासाठी वाहने खरेदी करण्यात आली आहेत . ही वाहने पोलीस विभागाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली . यावेळी ते बोलत होते . या प्रसंगी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई खासदार श्रीनिवास पाटील , खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर , आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले , आमदार जयकुमार गोरे , पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल , अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आदी उपस्थित होते . पोलीस विभागातील अनेक वाहने जुनी झाली होती . जिल्हा नियोजनच्या निधीमधून 13 स्कॉर्पिओ , 5 बलोरो , 6 व्हॅन व 48 मोटार सायकली पोलीस विभागास देण्यात आली आहेत .
या वाहनांचा बंदोबस्तासाठी मोठा उपयोग होणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मिदत मिळणार असल्याचेही पालकमंत्री श्री . पाटील यांनी यावेळी सांगितले . पोलीस विभागातील वाहने जुनी झाली होती . कायदा व सुव्यास्था राखण्यासाठी जिल्हा नियोजनमधून साडेतीन कोटी रुपये वाहनांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते . या वाहनांचा पोलीस विभागामार्फत योग्य उपयोग करुन पोलीसांमधील कार्यक्षमता व गतीमानता वाढणार असून , हा निधी मंजुर केल्याबद्दल लोकप्रतिनिधींचे आभार गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मानले .