उंब्रज मध्ये 50 बेडचे सुसज्ज कोविंड सेंटर व रुग्णवाहिका मिळण्याबाबत श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान (उंब्रज )यांनी पालक मंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना दिले निवेदन
कुलदीप मोहिते- कराड
सातारा ते कराड दरम्यान महामार्गालगत उंब्रज हे निमशहरी ठिकाण असून उंब्रज ची लोकसंख्या अंदाजे 45000 एवढी आहे उंब्रज व आजूबाजूच्या परिसरातील 40 छोट्या गावांचा उंब्रज या मध्यवर्ती ठिकाणी सर्व व्यवहार होत असतात दरम्यान कोरोना महामारी मुळे उंब्रज व आजूबाजूच्या परिसरामध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे एखादा पेशंट सिरीयस झाला तर त्याला कराड किंवा सातारा येथे हलवण्यात येते मुळातच जिल्ह्यामध्ये असलेल्या व्हेंटिलेटर बेडची संख्या अपुरी पडत आहे दरम्यान उंब्रज येथे 50 कोविंड बेडचे सुसज्ज सेंटर व्हावे त्यामुळे सातारा व कराड मधील हॉस्पिटल वरील जो ताण पडत आहे तो कमी होण्यास मदत होईल उंब्रज व परिसरातील लोकांची गैरसोय दूर होईल उंब्रज मध्ये सध्या एकच रुग्णवाहिका आहे सध्याची गरज लक्षात घेता उंब्रजला त्वरित अजून एक रुग्णवाहिका मिळावी अशा दोन मुख्य मागणीचे निवेदन उंब्रज येथील श्री शिव योद्धा प्रतिष्ठानने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना दिले आहे यावेळी शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बेडके उपाध्यक्ष शरद जाधव खजिनदार रणजीत कदम सचिव महेश जाधव सचिन जाधव रवींद्र वाकडे इत्यादी उपस्थित होते निश्चितच 50 कोविंड बेडचे सेंटर उंब्रज व आजूबाजूच्या परिसरासाठी दिलासादायक ठरेल