"माथेरानच्या राणीला 114 वर्ष पूर्ण"
चंद्रकांत सुतार--माथेरान
सह्याद्रीचा मनसोक्त आनंद घेण्याचे सगळ्यांचे आवडते ठिकाण म्हणजे माथेरान.मे १८५० मध्ये ठाण्याचे कलेक्ट एच पी मेलेटर यांनी माथेरान प्रकाशात आणले,छोटी आगीन गाडी आणि घोडेस्वारी हे येथे येणाऱ्या आबाल वृद्ध पर्यटकांचे आकर्षण.माथेरान १८५० मध्ये प्रकाशात आल्यानंतर त्यावेळी येथिल स्थानिक बंगले धारकांना, माथेरानच्या आकर्षणापोटी येथे येणे अत्यंत खडतर होते.१८५० मध्ये माथेरान प्रकाशात आले तरी १८५६ मध्ये मुंबई पुणे रेल्वे सुरू झाली, आणि यातूनच नेरळ माथेरान ट्रेन ची संकल्पना पुढे आली.त्याचे श्रेय सर्वस्वी "अब्दुल हुसेन आदमजी पिरभोय" या भारतीय नागरिकाला जाते.
माथेरान मिनी ट्रेन ची एक रंजक गोष्ट अशी अबुल हुसेन माथेरान ला जाण्यासाठी नेरळ येथे आले, त्यावेळी त्यांना नेरळ येथून कोणतंही वाहन साधन उपलब्ध न झाल्याने ते मुंबई ला परत गेले ते नेरळ माथेरान रेल्वे सूरु करण्याच्या निश्चयानेच. त्यांनी त्याची संकल्पना वडिलांकडे मांडली आणि त्या वेळी त्याच्या वडीलानी त्यांना १० लाख रुपयांचे भांडवल दिले.
२८ जुलै १९०४ ला नेरल माथेरान रेल्वे मार्ग उभारणीसाठी परवानगी मिळाल्या नंतर १५ एप्रिल १९०७ रोजी अवघ्या ३ वर्षाच्या कालावधित १९.०५ किलोमीटरम लांबीची रेल्वे सुरू केली.
या सर्व रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी पिरभोय कुटुंबियांसोबत, "रायसाहेब हरीचंद"यांचे ही अत्यंत मोलाचे योगदान आहे. तसेच सैन्याच्या तुकड्याचेही योगदान आहे."आदमजी पीरभोय" याचे स्वप्न आणि भांडवल जरी असले तरी "रायसाहेब हरीचंद" यांनी सुरुवाती पासूनच नेरळ माथेरान या रेल्वे साठी अतोनात कष्ठ घेतले. किंबहुना त्याच्या अनुभव मेहनत व कष्ठा मुळेच हा खडतर मार्ग पूर्ण झाला. त्यावेळी कोणतीही यंत्र सामग्री नसताना मनुष्य बाळावर रेल्वे मार्गासाठी काम सुरू झाले डोंगर फोडल्यामुळे,खोदकाम केल्यामुळं, अनेक साप कीटकांच्याहल्लामुळे कामात खोळंबा होत. हा अडथळा दूर करण्यासाठी अब्दुल हुसेन यांनी 1 साप मारण्यासाठी 1रुपया बक्षिस ठेवले.व असे अनेक अडथळे दूर केले. याच दरम्यान अब्दुल हुसेन जर्मनी ला जाऊन, जर्मनीच्या एका कंपनी कडून जर्मन बनावटीची 06 प्रकारातील 2 इंजिन बनवून घेतली. पुढे त्यांनी दार्जिलिंग क्लास, अ 040 हे इंजिन खरेदी केले. "आदमजी पीरभोय"यानी दिलेले १६ लाख रुपये भांडवल "रायसाहेब हरीचंद"याचा अनुभव कष्ठ, २हजार मजुरांची मेहनत यांच्या जोरावर "अब्दु हुसेन" यांनी माथेरान मिनी ट्रेन चे सोनेरी स्वप्न प्रत्येक्षात उतरवले. अखेर १९०७ साली माथेरान मिनी ट्रेन सुरू झाली. .
कालानुरूप बदल झाले पाहिजे पण माथेरानच्या गाडी बद्दलच अबाल --वृद्धांच्या मनातील आकर्षण मात्र जराही कमी होणार नाही, माथेरानच्या मिनी ट्रेन बद्धल अशा ह्या एखाद्या यंत्राबद्धलचा आपलेपणा अन्यत्र कुठेही असेल असे वाटत नाही . कारण आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जपून ठेवलेले वैभव ते आपणच जपले पाहिजे.
नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनने येतान लहान मोठे वळणे तेव्हढेच अवघड धोक्याची वळणे घेत ही छोटी मिनी ट्रेन आज वय 114 वर्षपूर्ण करतेय पणआजही तरुणीने सौंदर्याने नटलेल्या या फुलराणीचे सौंदर्यवती रुपडे अधिकच खुलते, माथेरान ची गाडी मानव आणि निसर्ग यातील एक अविस्मरणीय दुवा आहे.ह्या गाडीने प्रवास करावा नी हिरवीगार झाडे रंगीबेरंगी फुले,पक्षी, असा निसर्गाचा आस्वाद घेत जीवन ताजेतवाने करून घ्यावे,इथल्या संपूर्ण वातावरणातला सकारात्मक दृष्टीकोन, प्रत्येक ऋतूत तुम्हाला वेगवेगळ्या छटा पहावयास मिळतात.
माथेरानची धडकण असलेली मिनी ट्रेन ची बॉलिवूडलाही मोह पडलाच "कहाणी किसमत की , "जब याद किसींकी आती है' सौदागर, ,गोल्डस्पॉट ची जाहिरात असे अनेक चित्रपटात याच निसर्गाच्या साक्षीने माथेरान ची राणी हिरॉईन म्हणून पडदयावर भाव खाऊन गेली
मिनी ट्रेन वर्ड हेरीटेज जागतिक पुरातन वास्तू मान्यता प्राप्तसाठी नोंद घेतली आहेच
अपघात -:26 जुलै 2005 च्या अतिवृष्टीमुळे माथेरान रेल्वेची प्रचंड वाताहत झाली, ठीक ठिकाणी रेल्वे फक्त टांगत होत्या तर काही ठिकाणचे संपूर्णपणे रेल्वेचं मातीच्या दगडाच्या ढिगाऱ्याखाली दबले होते , त्या वेळी ती परिस्थिती पाहता माथेरान ची रेल्वे पुन्हा धावेल का हा प्रश उभा ठाकला होता, परंतु रेल्वे प्रशासनाच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे, मजुरांच्या मेहनत मदतीमुळे आठ महिन्याच्या कालावधीत मिनी ट्रेन पूर्वपदावर आली .
पूर्वी मिनी ट्रेन च्या 10 फेऱ्या होत असे परंतु आता प्रगत तंत्रज्ञानाच्या ताकदीवर करोडो रुपये खर्च करून या मार्गाचा होत असलेला बदल नवनवीन प्रणाली इंजिने ,डब्बे, हे जरी असले तरी आजच्या सद्या स्थितीत मात्र एकही फेरी नेरळ माथेरान नेरळ होत नाही हे दुर्दव्य.नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनचा प्रवास म्हणजे आनंद, मज्जा निसर्गाशी ओळख करून देणार प्रवास ,सुरवाती पासूनच चढाव नागमोडी वळणे घेतघेत गाडी माथेरांनकडे येत असते
ह्या प्रवासात एक छोटा बोगदा लागतो गाडी बोगद्यातून जाताना सर्वच पर्यटक मजेत शिट्या मारणे ओरडणे होत असते एक क्षणात डावी खिडकीचे दृश्य उजव्या खिडकीतून दिसायला लागते कारणअंधाऱ्या बोगद्यातून गाडीने गोलाकार वळसा घेत पुढे जात असते आपल्याला दिसणारे दृश्य निसर्ग क्षणात तिकडे कसा दिसायला लागले ,हा अनुभव प्रत्येकाला अचंबीत करणारा आहे. ह्याच प्रवासा दरम्यान नेरळूहून येताना पहिले जुमापट्टी हे स्टेशन दुसरे वॉटर पाईप स्टेशन तर पुढे अमंनलॉज स्टेशन अशी तीन स्टेशन लागतात ,संपूर्ण रेल्वेमार्ग एक पदरी असल्याने पूर्वी कोळसा इंजिनला पाणी व कोळसा भरणे , खाली करणे आवश्यक होते, शिवाय नेरळहुन गाडी आली त्याच वेळी माथेरान हुन गाडी आली तर ह्या तीनही स्टेशनवर साईड रेल्वे ट्रक असल्याने एक गाडी आली की दुसरी तिला ज्या स्टेशनवर मिळेल तेथील साईड देत पुढे जायाची, यासाठीच ह्या स्टेशनचे महत्व आहे, माथेरान मिनी ट्रेन ची आणखी एक खासियत, म्हणजे नेल बॉल टोकनलॉक ही प्रणाली ही वैशिष्ट्य पूर्ण यंत्रणा पूर्वीपासून कार्यान्वित आहे माथेरान रेल्वे स्टेशनमध्ये ह्या यंत्रणेचा खटका दाबल्यास वॉटर पाईप स्टेशनमध्ये आवाज जातो, व रेल्वे मार्ग मोकळा आहे याचा सूचना मिळते, तसेच गाडी वॉटर पाईप स्टेशनमध्ये गेल्यावर तेथील यंत्रणेत हा बॉल टाकल्यास माथेरान स्थानकात आवाज जातो याचा अर्थ माथेरान हुन गाडी निघाली ती वॉटर पाईप स्टेशनमध्ये पोहोचली, प्रत्येक दोन स्टेशनमध्ये ही यंत्रणा काम करते सद्याच्या अत्याधुनिक सिग्नल प्रणाली मध्ये ही यंत्रणा नेरळ माथेरान विभागात आपले वेगळे स्थान टिकवून आहे .
माथेरानच्या मिनी ट्रेन सुरवातीपासून ते आज पर्यंत अनेक बदल झाले पण माथेरानची राणी सुटण्याची व येण्याची सूचना देणारी घंटा आजही तशीच आहे पुढील काळ ही राहील .
१०० वर्षा पेक्षा जास्त कालावधी मध्ये कोट्यवधी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली माथेराची मिनी ट्रेन.माथेरानची आता लाईफ लाईन झाली आहे. काळानुरूप बदल झाले पाहिजे पण माथेरानच्या गाडीचे अबाल--वृद्धांच्या मनातील आकर्षण मात्र जराही कमी झालेले नाही.