प्रसिद्ध दिग्दर्शक व समाज अभ्यासक सुमित्रा भावे यांचे पुण्यात खासगी रुग्णालयात निधन
मिलिंद लोहार-पुणे
वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या आयसीयूमध्ये होत्या. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे आज त्यांची प्राणज्योत मालावली. सुमित्रा भावे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर पुण्यातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक, सामाजिक विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.
सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ‘बाई’, ‘पाणी’ या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये ‘दोघी’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, कप च्या’, असे बरेच चित्रपट गाजले. त्यांच्याअनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. अनेक वर्षापासून केलेले त्यांनी कार्य व महत्त्वाचे चित्रपट हे सर्व जनतेच्या परिचित आहेत मात्र एका कलाकाराला घडवण्यात मागे त्यांचा खूप मोठा हात होता त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील मराठी चित्रपट प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे