"लस घेण्यासाठी गर्दी-लसीचा तुटवडा"
म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्र ठप्प!
अरुण जंगम-म्हसळा
कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असताना लसीचा तुटवडा झाला असल्याने आज अवघ्या 40 ते 50 नागरिकांना लसीकरणाचा लाभ घेता आला.महाराष्ट्र राज्यातच लसीचा तुटवडा असल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे लसीकरणावर होऊन केंद्र बंद पडत आहेत.म्हसळा ग्रामीण रुग्णालयात लसीच्या उपलब्धता बाबत डॉ.अलंकार करंबे यांच्याकडे विचारणा केली असता रायगड जिल्हा अलिबाग रुग्णालयात लसीची कमतरता आहे तरी आजच काही प्रमाणात म्हसळा ग्रामीण रुग्णालय लसीकरण केंद्रासाठी लसीची उपलब्धता होणार असल्याचे सांगितले.वरिष्ठांकडे संपर्क करून लस आणण्यासाठी गाडी रवाना केली असल्याचे डॉ.करंबे यांनी माहिती देताना सांगितले.
असे असले तरी देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी कालच व्हिसी द्वारे राज्यातील मुख्यमंत्री महोदयांना राज्यात 14 ते 21 एप्रिल पर्यंत"लसीकरण महोत्सव"साजरा करण्यास सांगितले आहे या वरून एक दोन दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात लसीची उपलब्धता होईल अशी शक्यता नाकारता येत नाही.