Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी कामथे उपजिल्हा रुग्णालयाला दिले ५ हजार मास्क

काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी कामथे उपजिल्हा रुग्णालयाला दिले ५ हजार मास्क

ओंकार रेळेकर-चिपळूण



वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पाश्वभूमीवर काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांनी कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ५ हजार मास्कचे वाटप केले. श्री. यादव यांच्यावतीने कृष्णा महाडिक यांनी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाँ. सानप यांच्याकडे हे मास्क सुपुर्द केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्री. यादव यांचे आभार मानले.

                कोरोना विषाणूने पुन्हा हातपाय पसरले आहेत. दिवसाला मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत कामथे उपजिल्हा रूग्णालयातील अधिकारी व कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वांना सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी सामाजिक बांधिलकीतून श्री.यादव यांनी मास्कचे वाटप केले असल्याचे युवक काँग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष फैसल पिलपिले यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies