आमदार शशिकांत शिंदे यांची पुसेगाव येथील असलेल्या डेडिकेटेड कोव्हीड सेंटरला भेट, सर्व उपाययोजनाचा घेतला आढावा
प्रतीक मिसाळ- कोरेगाव
आज पुसेगाव येथील डेडिकेट कोव्हिडं सेंटर ला भेट देऊन उपाय योजनांची माहिती घेऊन संबंधित अधिकारी यांना सूचना आमदार शशिकांत शिंदे यांनी केल्या . येथील अडचणी समजून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला . महावितरण विभागाशी संपर्क साधून विद्युत पुरवठा संदर्भातील अडचणी दूर केल्या . तसेच जनरेटर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले . या सेंटर साठी लागणारी औषधे व इतर आरोग्य यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे . अंगापूर , क्षेत्र माहुली व वडूथ येथे उभारण्यात येणाऱ्या कोव्हीड सेंटरसाठी व उभारलेल्या पुसेगाव डिसीसी साठी नुकताच ५० लाख निधी मंजूर करून देण्यात आला आहे . हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना केल्या . येथे लागणाऱ्या आरोग्य सुविधा व यंत्रणा कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी आ . शशिकांत शिंदे यांनी दिली . कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे .
त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे रोज कोरेगाव , सातारा , खटाव भागातील आरोग्य सुविधेकडे लक्ष ठेऊन आरोग्य विभागाला योग्य त्या सूचना देत आहेत . या पार्श्वभूमीवर डेडिकेटेड कोव्हीड सेंटर तातडीने उभारण्यात यावीत यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रयत्न करून हे सेंटर आता सर्व सोयी सुविधा सहित येथे उभे राहत आहेत . कोरोना काळात लोकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी आमदार शशिकांत शिंदे झटत आहेत . लोकांची हॉस्पिटलची वाढीव बिले , औषध पुरवठा , इतर सामुग्री पुरविण्याचे काम आमदार शशिकांत शिंदे साहेब करत आहेत . चारही कोव्हीड सेंटर व कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयातकोणत्याही औषधांची , आरोग्य यंत्रणांची कमी भासू देणार नाही असे यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले .