श्रीवर्धनमध्ये डॉक्टरने केला रुग्ण महिलेवर बलात्कार
अमोल चांदोरकर- श्रीवर्धन
श्रीवर्धन शहरातील बाजारपेठेत दवाखाना चालवणाऱ्या डॉक्टर वरती पीडित महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार दिनांक 19 एप्रिल 2021 ला फिर्यादी महिला श्रीवर्धन बाजारपेठेतील डॉक्टर कडे वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते. सदर प्रसंगी महिलेने डॉक्टरला तिच्या छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानुसार डॉक्टरने फिर्यादी महिलेस तपासण्यास सुरुवात केली. फिर्यादी महिलेने फिर्यादीत म्हटले आहे डॉक्टर तपासणी करत असताना तिने डॉक्टर कडे आपण काय करत आहात याविषयी विचारणा केली. तर डॉक्टरने मी तुमची तपासणी करत आहे असे उत्तर दिले. त्यानंतर डॉक्टर ने अपकृत्य केल्याचे महिलेने म्हटले आहे. संबंधित फिर्यादी महिलेने दिनांक 20 एप्रिल 2021 ला डॉक्टर विरोधात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अपकृत्य केल्या कारणे गुन्हा दाखल केला आहे . संबंधित डॉक्टर श्रीवर्धन मध्ये अनेक वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. आज रोजी डॉक्टरचे वय 66 वर्षे आहे.तसेच संबंधित आरोपी डॉक्टर दमा,मधुमेह व उच्च रक्तदाब या व्याधींनी त्रस्त असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. फिर्यादी महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित डॉक्टरला अटक केली असून न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली आहे. सदर गुन्ह्यांचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एस के गावडे करत आहेत.