पुण्यातील कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी पुणे महानगरपालिका सक्षम - चंद्रकांत पाटील
मिलिंद लोहार -पुणे
वाढत्या गरजांनुसार झपाट्याने पावलं उचलत आहे. आज Murlidhar Mohol यांच्या महापौर विकास निधीतून पुणे शहराला उपलब्ध करून देण्यात आलेल्या ९ उत्तम दर्जाच्या रुग्णवाहिकांचे उदघाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या ९ रुग्णवाहिकांमध्ये २ अद्ययावत कार्डियाक, २ रुग्णवाहिका आणि ५ शववाहिकांचा समावेश आहे. या लोकार्पणाप्रसंगी उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर, आयुक्त विक्रम कुमार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शहर सुधारणा समिती अध्यक्ष आनंद रिठे, क्रिडा समिती अध्यक्ष अजय खेडेकर यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.
पुणे शहरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होतेय, हे पुणे महानगरपालिका आणि नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांचेच यश आहे. त्यामुळे लवकरच पुणे शहरातील कोरोनाचे चित्र बदलेल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांना वाटतो.