बहुरूपी कलाकारांवर पुन्हा उपासमारीची वेळ.
सरकारने आमच्याकडेही लक्ष द्यावे -बहुरूप्यांची मागणी
राम जळकोटे-तुळजापूर
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असून उद्योगधंदे बंद झाल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे.असे असताना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वसा जपणाऱ्या बहुरूपी लोककलावंतावर पुन्हा उपसमारीची वेळ आली आहे.गेल्या वर्षभरापासून या महाभयंकर कोरोनाने अनेकांचे कंबरडे मोडले आहे.अनेक जण मोठं मोठाली शहरे सोडून आपल्या गावीच ठाम मांडून बसले आहेत.परंतु गेल्या वर्ष भरात कसा बसा आपला प्रपंच लोकांनी चालवला मात्र आता अनेकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे..??आपल्याकडे असलेल्या कलेच्या माध्यमातून जनसामान्यांचे मनोरंजन करणारा हा बहुरूपी आता पुन्हा एकदा मोठ्या संकटात अडकला आहे.गावोगावी, शाळा,कार्यालये,आणि घरदारांसमोर जाऊन आपली कला सादर करून मिळेल ते घेऊन आपला प्रपंचाचा गाडा हाकणारा हा बहुरूपी आता याच्या समोर जगणं अवघड झालं आहे.गेल्या वर्ष भरामध्ये कोरोनाच्या थैमानाने घराबाहेर पडणं मुश्किल झालं आणि आता पुन्हा सुद्धा सरकारने राज्यात कडक लॉकडाउन केले. १,२ रुपयांचे बक्षीस आणि मूठभर धान्य घेऊन आपले कुटुंब चालवणाऱ्या बहुरूपी अडचणीत सापडला आहे. आपल्या अंगी असलेली कला,आणि त्यातुन मिळणारी बक्षीस घेणं आता अवघड झाल आहे.ग्रामीण भागात " चला बाई चला ,लग्नाला चला,३२ तारखेला लग्नाला चला,यांसारख्या मनोरंजन करणाऱ्या आणि खदखदून हसवणाऱ्या गोष्टी मधून हास्यकल्लोळ माजवणारा हा बहुरूपी अडचणी मध्ये आहे.आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथे या बहुरूपिंची मोठी लोकवस्ती आहे.राज्य सरकारने यांच्या बाबतीत विचार करायला हवा.कोरोनाचे सावट आणि त्याच दरम्यान हातावरील पोट असणाऱ्यावर संकट ओढवल आहे.महाराष्ट्रात इतर विषय चर्चेत असतात मात्र आमचाही कुठं तरी सरकारने विचार करावा अशी मागणी बहुरूपी करत आहेत.या कोरोनाच्या सावटामुळ हाताला काम मिळणं ही अवघड झालं आहे.कोरोनाच्या अगोदर आमच्या कडे जेवढ काही होत ते आता संपलं आता तरी सरकारने आमच्या लेकरा बाळाकडे पाहुन काही तरी आमच्या साठी करावं अशी मागणी बहुरूपी करत आहेत. ईश्वर करो,अवघ्या महाराष्ट्राला खदखदून हसवणाऱ्या या बहुरूपिना पुन्हा एकदा त्यांची कला सादर करण्यास वाव मिळो.
गे ल्या वर्ष भरापासून आम्हीही या कोरोनाशी लढा देत आहोत,मात्र आता आमच्या समोर जगण्यासाठी मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.आमच्या कडे माय बाप सरकारने लक्ष द्यावं आमची परिस्थिती सध्या खूप भिकट होत चालली आहे.
- गणेश शेलार, बहुरूपी.