पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या 'कोविडशील्ड' या लसीचे दर जाहीर
मिलिंद लोहार -पुणे
देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना लसीकरण हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सरकारांनी लसीकरणावर भर देण्याचे ठरवले आहे. अशातच पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या 'कोविडशील्ड' या लसीचे दर जाहीर केले आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने निश्चित केलेल्या दरानुसार राज्य सरकारांना सिरमची कोविडशिल्ड ही लस 400 रुपये प्रति डोसच्या हिशेबानं तर खासगी रुग्णालयाला सिरमची लस 600 रुपये प्रति डोसच्या हिशेबाने देणार आहेत. एकूण लसीच्या उत्पादनाच्या 50 टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी दिला जाणार आहे.
तसेच उर्वरित राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना दिला जाईल अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली आहे.