कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोशल डीस्टंस न पाळता नागरीकांनी केलेली गर्दी.
उमेश पाटील -सांगली
संपूर्ण राज्य कोरोनाच्या जिवघेण्या विळख्यात अडकल्याने शासन यातुन बाहेर पडण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाय योजना करत असून त्याचाच एक भाग म्हणून लाॕकडाऊन घोषीत करुन संचारबंदी लागु केली असतानाच कुंडल(ता.पलूस) येथे जवळजवळ पन्नास एक युवकांनी एकत्र येत एका मित्राचा वाढदिवस मंगळवारी सायंकाळी एका मैदानात साजरा करुन लाॕकडाऊन ला हरताळ फासला असून कोरोनामुळे होणारी जिवीत हानी थांबविण्यासाठी प्रयत्न करणार्या प्रशासनाच्या प्रयत्नांना खो घालण्याचे काम होत असल्याने पोलीस, आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत प्रशासन कोणासाठी धडपडतय हे यांना समजत नाही का? असा सवाल सुज्ञ नागरीक करत आहेत.
एकीकडे प्रशासन कोरोनाचा झपाट्यने होणारा प्रसार थांबविण्यासाठी पोलीस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचार्यासह प्रशासकीय अधिकारी , कर्मचारी, शिक्षक स्वतःसह कुटूंबाची पर्वा न करता रस्त्यावर उतरुन सर्वसामान्यांच्या साठी प्रयत्नशिल असताना काही युवक व नागरीक मात्र आपल्या बेजबाबदार वागण्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांना खो घालण्याचे काम करत आहेत.
विनाकारण चौका-चौकात बसून मावा, तंबाखू खाऊन पिचकार्या मारताना दिसत आहेत तर गावातील प्रमुख चौकामध्ये ठेवलेल्या बाकड्यावर एकत्रीत बसुन गप्पांचे फड रंगत असून कुंडलमध्ये अजून ही बँकांच्या बाहेर, महा -ई सेवा केंद्र, आंबेडकर चौक, चौंडेश्वरी मंदिर, शिवाजी चौक, बोर्डींग, जोतीबा मंदिर, लक्ष्मी चौक, साठेनगर, सावित्रीबाई फूलेनगर येथे सकाळी व सायंकाळ नंतर नागरीक विशेषतः युवक विनामास्क एकत्रीत येऊन गप्पा मारताना दिसत आहेत, पोलीसगाडी आली की पळुन जायचे व गाडी गेली की परत जैसे थे परस्थिती , त्यामुळे पोलीस ही वैतागुन गेले असून या जिवघेण्या परीस्थितीची जाण या युवा पिढीला कधी येणार ?
....लस घेण्यासाठी ही गर्दी....
सद्या कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे काम सुरु असून रुग्णालय प्रशासनापुढे लस द्यायची की गर्दी आवरायची हा प्रश्न पडत असून नागरीक लस घेण्यासाठी आलेनंतर रुग्णालय प्रशासनाला न जुमानता गर्दी करुन सोशल डीस्टंसिंगचा फज्जा उडवत असून या गर्दिने नागरीकाबरोबरच रुग्णालयात काम करणार्या कर्मचार्यासह आशा, यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका असलेने कर्मचारी जिव मुठीत घेऊन काम करत आहेत.
पोलीसांची गांधारीची भुमिका...
कुंडल पोलीसाकडून विनाकारण फीरणार्यावर व वेळेनंतर दुकाने छुप्या पद्धतीने सुरु ठेवणार्यावर व अवैद्य धंद्यावर कडक कारवाई होत नाही. पोलीस सायरन वाजवत गाडीतून फिरत असल्याने सायरनचा आवाज आला की युवक लपून बसतात व गाडी गेली की पारत रस्त्यावर येत असल्याने विनाकारण फीरणार्यावर व चौकात थांबणार्यावर कारवाई न होता जो कामानिमित्त ये-जा करतो तो पोलीसांच्या तावडीत सापडतो अन पोलीस त्याच्यावर कारवाई करुन सोपस्कार पुर्ण करत असल्याने नागरींकांच्यात पोलीसाविषयी भिती ऐवजी चिड निर्माण होत आहे.