Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोरोनाची गंभीर परिस्थिती संपुर्ण महाराष्ट्रात.. मग फक्त सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री कसे जबाबदार -बालाजी सलगर

कोरोनाची गंभीर परिस्थिती संपुर्ण महाराष्ट्रात.. मग फक्त सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री कसे जबाबदार -बालाजी सलगर 

दत्तात्रय शेडगे -खोपोली

महाराष्ट्रात कोरोना महामारीची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरली आहे ही बिकट परिस्थिती संपुर्ण महाराष्ट्रात आहे सरकार,पालकमंत्री, प्रशासकीय अधिकारी,डाॅक्टर  परिस्थिती हाताळण्याचे पुरेपूर  प्रयत्न करीत आहेत लवकरच कोरोना महामारीवर विजय मिळवू असा विश्वास व्यक्त होत असतांना दुसरीकडे सोलापूर जिल्हात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याचा आरोप स्वताःच्या पक्षाचे कार्यकर्ते हनुमंत मांढरे यांनी केल्याने त्यांचा बालिशपणा समोर आला आहे कोरोना महामारीत मदत करण्यापेक्षा या परिस्थितीला पालकमंत्री दत्तात्रय भरणे जवाबदार असुन त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी या बिकट परिस्थितीत करणे चुकीचे आहे.सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे हे मतदारसंघाला लागुन इंदापुरचे आहेत पाहिजे तेव्हा सोलापूरला जातात सर्वांत  जास्त वेळ सोलापूरला जिल्हात देतात पालकमंत्री जवळचे असल्याने शासकीय पैशांची बचत होते कार्यकर्तेंना वेळ दिला जातो कोरोना महामारीच्या आढावा बैठक वेळोवेळी घेतात पालकमंत्र्यांचे योग्य नियोजन जवाबदारीने काम करण्याची पध्दत एखाद्या कार्यकर्ताला रुचली नसावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवर आहे म्हणून कार्यकर्तेच्या अपेक्षा वाढने स्वाभाविक आहे त्यामुळे करमाळा गावांचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे हे आमदार संजय मामा शिंदे यांचे कार्यकर्ते आहे त्यांच्या भावना समजु शकतो त्यांचे आमदार मंत्री झाले पाहिजेत ही सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा असते पण राजकारणात सत्ता खुर्ची म्हत्वाची राहत नाही तर पक्ष महत्वाचा असतो पक्ष जो निर्णय घेतात तो सर्वांना मान्य करावा लागतो आमदार  संजय मामा शिंदे हे आपल्या पक्षांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहे त्यांना पक्ष जबाबदारी देईल यांत शंका नाही त्यासाठी कार्यकर्तेंनी उतावीळपणा दाखवण्यासाठी गरज नाही असा संल्ला राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सामाजिक न्याय विभागाचे बालाजी सलगर यांनी दिला आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies