कडाव गाव व बाजारपेठ परिसरात निर्जंतुकीकरणाचे काम सुरू
नरेश कोळंबे-कर्जत
कडाव गाव व बाजारपेठेत वाढणारे रुग्ण तसेच झालेले मृत्यू यामुळे कडाव गावात भीतीचे सावट आहे. त्यातच बाजारपेठेत कोणतेही संक्रमण होऊ नये म्हणून मागेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कडाव व परिसर कंटेनमेंट झोन जाहीर केले आहे. गावातील होणारा संक्रमण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशन यांनी बाजारपेठ बंद ठेऊन या संक्रमणा ला आळा घालण्यासाठी प्रयत्न केला. आज याच धर्तीवर बाजारपेठ व गाव परिसरात रासायनिक फवारणी करण्यात आली.
गावातील संक्रमण थांबविण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत कडाव यांनी पुढाकार घेत प्रत्येक घराचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठ व प्रत्येक घर निर्जंतुक होईल याची काळजी घेत स्वतः उपसरपंच यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत फवारणी करण्याचे काम केलं. यावेळी सरपंच अशोक किसन पवार, उपसरपंच हर्षद भोपतराव, तसेच ग्रामसेवक , ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते