माकणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्राम कोरोना नियंत्रण समितीची बैठक घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन
राम जळकोटे-उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात दि.18 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता ग्राम कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा सरपंच विठ्ठल साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीमध्ये कोरोणा नियंत्रण करण्यासाठी सर्वांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे sanitizer चा वापर करणे, 45 वर्षाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण करणे, प्रत्येक कुटुंबातील सर्दी ताप खोकला, इत्यादी लक्षणे असणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोरोणा टेस्ट घेणे व तसेच मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्स न पाळणारे नागरीकांकडुन 500 रुपये दंड वसूल करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. व तसेच किराणा दुकानदार, भाजीपाला विकणारे, दुकानदार फळे विकणारे, पिठाची चक्की मालक, दूधवाला यांची कोरोणा टेस्ट करून घेण्यात येवुन गावात याबाबत जनजागृती करण्याचे ठरले. या बैठकीस समितीचे सर्व सदस्य, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित होते.