Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कडाव बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद ; व्यापारी असोसिएशनने घेतला निर्णय

 

कडाव बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद ; व्यापारी असोसिएशनने घेतला निर्णय

नरेश कोळंबे-कर्जत

   


     कर्जत तालुक्यातील कडाव या महत्वाच्या बाजार पेठेत अनेक कोरोना संक्रमित लोक सापडत आहेत. या संक्रमणाला आळा घालण्यासाठी कडाव येथील व्यापारी असोसिएशन ने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 

          वाढता कोरोना चा आकडा पाहता आता या कोरोनाच्या दुसऱ्या लाटे पासून प्रत्येकाने आपला बचाव व्हावा,  म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. ह्याच धर्तीवर कडाव व नजीकच्या गावात सुध्दा वाढलेला कोरोनाचा आकडा हा सर्वांची काळजी वाढवणारा आहे. कडाव बाजारपेठ ही आसपासच्या अनेक गावांसाठी महत्वाची बाजारपेठ असल्याने येथे खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. 



बाजारपेठेत विक्री करण्यासाठी सुद्धा बाहेरून लोक येत असतात म्हणून कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता असल्याने 8 एप्रिल रोजी कडाव ग्रामपंचायत सरपंच अशोक  पवार, कडाव ग्रामपंचायत उपसरपंच हर्षद भोपतराव व  कडाव व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष सतीश पवाळी, व उपाध्यक्ष  मंदार जाधव  यांनी सर्व व्यापाऱ्यांशी काल चर्चा करत बाजार पेठ बंदीचा निर्णय घेतला. तसेच लोकांची विविध गोष्टीत  होणारी फसवणूक टाळण्यासाठी सुध्दा या असोसिशनकडून निर्णय घेण्यात आले. चढा भाव घेणारे किराणा दुकानदार व खाजगी रुग्णालय यांचा मनमानी कारभार थांबावा व या गोष्टींना चाप लागावा म्हणून सदर ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशन कडून विविध रुग्णालयातील वस्तूंचे दर पत्रक जाहीर करण्यात आले आहे व त्यामुळे ह्या उपक्रमाची दखल घेत सर्व नागरिकांकडून ह्या ग्रामपंचायत व व्यापारी असोसिएशन यांचे कौतुक होत आहे. 


 गेल्यावर्षी कोरोनाच्या या संक्रमणाचा फायदा घेत अनेक खाजगी रुग्णालयांनी आपले खिसे भरले व त्यामुळे गोरगरीब जनतेला नाहक भुर्दंड सोसावा लागला व त्रास झाला याच गोष्टी लक्षात घेत आम्ही हे खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय सेवा व औषध यांचे  दरपत्रक जाहीर केले आहेत. जेणेकरून जादा पैसे घेण्याला कुठे तरी चाप बसेल तसेच  वाढता संक्रमण हा काळजीचा विषय असल्याने आम्ही तात्काळ सर्व व्यापाऱ्यांची सभा घेऊन पूर्ण बाजारपेठ बंदीचा निर्णय घेतला आहे. 


       हर्षद भोपतराव ( उपसरपंच , ग्रा. कडाव )

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies