Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरला DCHC ची मिळाली मान्यता ,

 डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरला  DCHC ची मिळाली मान्यता 

 नरेश कोळंबे-कर्जत



  कर्जत तालुक्यातील वाढणारी कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाहता कर्जतमध्ये एखादं सुसज्ज  असा दवाखाना असावा , अशी मागणी कर्जतकर करताना दिसून येत होते. त्यातच मागील आठवड्यात सुखम हॉस्पिटलला कोविड केअर सेंटरचा परवाना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला होता. वाढते रुग्ण पाहता कमी दरात आणि सहज उपलब्ध होतील असे उपचार मिळावे यासाठी प्रशासन सुध्दा सज्ज झाले असून १६ तारखेला नंदकुमार तासगावकर यांनी रायगड हॉस्पिटलला DCHC  (Dedicated covid health center ) परवाना मिळावा, यासाठी कर्जत तालुका तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला होता . त्याला काल दि १७ रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मान्यता दिली असून येत्या काही दिवसात रायगड हॉस्पिटल हे DCHC म्हणून कोरोना रुग्णांसाठी सज्ज होत आहे , म्हणून लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे 



              कर्जतमध्ये  कोरोना रुग्ण हे आदिवासी वाडी, शहर आणि गाव ठिकाणी सापडत असून प्रत्येक रुग्णावर सध्या कर्जत येथील कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार होत आहेत. वाढणारी रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाने कर्जत येथील आणखी एका खाजगी सूखम रुग्णालयाला CCC ( covid care center ) ची मान्यता मागील आठवड्यात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली होती. पडणारा आरोग्य व्यवस्थेवरील  ताण पाहता सर्वांनी जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरविणे आवश्यक झाले आहे म्हणूनच कर्जत परिसरातील रुग्णांनी बाहेर शहरात जाऊ नये व सर्व सुविधा कर्जतमध्ये उपलब्ध व्हाव्यात म्हणून  जिल्हाधिकारी निधी चौधरी आणखी एका खाजगी रुग्णालयाला DCHC ची परवानगी दिली आहे. रायगड हॉस्पिटल हे मागील वर्षी CCC म्हणून सेवा देत होते, सध्या ३९० बेड या रूग्णालयात असून  ह्या रुग्णालयात आणखी सुविधांचा पुरवठा शासनाने केला तर हे सुसज्ज हॉस्पिटल सर्व सेवा लोकांना पुरवू शकेल, असे मत रायगड आणि रिसर्च सेंटर डिकसळचे चेअरमन डॉ नंदकुमार तासगावकर यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे मांडले होते. त्याचाच परिणाम म्हणून काल १७ रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरला Dedicated covid health center चा परवाना दिला आहे. त्यामुळे कर्जत मधील रुग्णांना सर्व सोयी डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल येथेच मिळणार असून त्या योग्य भावात व लोकांना परवडतील अशा असतील, अशी आशा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर शेळके यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies